शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शीतलहर भाजीपाला पिकांना बाधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. ...

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पारा ५.२ अंशावर : कांदा, केळी,तूर, मिरची टोमॅटोला घातक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. साधारणपणे एक आठवड्यापसून तापमान सात ते १२ अंशाच्या आसपास आहे. यामुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. गेल्या दोन दिवसांतील थंडी पिकांना बाधक ठरणारी आहे. गहू, हरभऱ्याचे एकवेळ ठीक मात्र, भाजीपाला पिकांना ही थंडी घातक ठरणारी आहे.यंदाच्या हंगामात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत रबीची आशा नाही. मात्र, काळ्या पोताच्या व संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या जमिनीत मात्र, रबीची पेरणी झालेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार एक लाख ६९ हजार ३४१ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत एक लाख सहा हजार १६३ हेक्टरमध्ये रबीची पेरणी झालेली आहे. याची ६२.६९ इतकी टक्केवारी आहे. सद्यस्थितीत हरभऱ्याची १,११,२३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८६,५६० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. दोन आठवड्यापूर्वी असलेल्या ढगाळ वातारणामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, लगेच वातावरण कोरडे झाल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थापन करता आले. गव्हाच्या पेरणीसाठी थंडावा आवश्यक असल्याने ५६,२१४ हेक्टरपैकी १८,७१९ हेक्टरमध्ये सध्या पेरणी झालेली आहे. ही ३२.७२ टक्केवारी आहे. विहिरीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने कमी आल्याने गव्हाचे ५० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे.सलग दोन दिवसांपासून ५ ते ६ अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने तुरीच्या पिकासह टोमॅटो व केळीचे पीक अतिथंडीमुळे करपण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.थंडीचे व्यवस्थापन महत्त्वाचेसध्याचे तापमान गहू, बरभरा पिकाला पोषक आहे. मात्र, ५ अंशांपर्यंत घसरल्यास त्याला शीतलहर (कोल्ड वेव्ह) म्हटले जाते. या परिस्थितीचा प्रामुख्याने टोमॅटो, तूर, मिरची, कांदा व सर्वाधिक केळीच्या पिकाला धोका आहे. पानातील प्रोटोप्लॉझ्माचे क्रिस्टलायझेशन होत असल्याने पिकाला याचा धोका उत्पन्न होतो व पीक जागीच वाळायला सुरूवात होते. यापूर्वी सन २०११ मध्ये तापमान पाच अंशावर गेल्यामुळे शीतलहरेचा धोका निर्माण झाला होता. अनेक शेतामधील टोमॅटो, केळी, मिरची, कांदा व तुरीचे पीक जाग्यावरच सुकले होते. नदी-नाल्याकाठच्या शेतात शेकोटी पेटवाव्यात, मल्चींग आदी उपाययोजना कराव्यात. ज्या शेतात धुºयावर झाडे नाहीत त्या शेतात मात्र, काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.