शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

थंडी पोषक, ढगाळ वातावरण घातक

By admin | Updated: January 18, 2017 00:03 IST

मागील दोन आठवड्यापासून थंडीची लाट गहू व हरभऱ्यासाठी पोषक असताना अचानक वातावरणात बदल झाला.

रबी हंगाम : हरभरा, फळपिकांवर किडींची शक्यताअमरावती : मागील दोन आठवड्यापासून थंडीची लाट गहू व हरभऱ्यासाठी पोषक असताना अचानक वातावरणात बदल झाला. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे हरभऱ्यासह फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यास पिकांच्या सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. यंदाच्या रबी हंगामात एक लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्याच्या सरासरी एक लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणीची ही टक्केवारी ११२ टक्के आहे. यंदा जिल्ह्यात हरभऱ्यासाठी ९३ हजार सरासरी क्षेत्र असताना एक लाख १२ हजार ८०० हेक्टर पेरणी झाली. पेरणीची ही टक्केवारी १२१ टक्के आहे. तसेच गव्हासाठी ४६ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना ४७ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही टक्केवारी १०३ टक्के आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जमिनीत, शेतात मोठ्या प्रमाणात असलेली आर्द्रता, विहिरींच्या जलपातळीत झालेली वाढ, धरणात पाण्याचा मुबलक कांदापिकावर अनिष्ट परिणामअमरावती : साठा असल्याने रबीला सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी व खरिपामधील सोयाबीन, मूग व उडदाचे रिक्त झालेले क्षेत्र आदी घटकांचा परिणाम होऊन यंदा रबीची विक्रमी क्षेत्रवाढ झाली. मागील महिनाभऱ्यापासून पडलेली थंडी व उबदार वातावरण गहू व हरभरा पिकास पोषक होते. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे यामुळे हरभऱ्यावर घाटेअळी व फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदापिकावर देखील वातावरणाचा अनिष्ट परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळीच व्यवस्थापन केल्यास सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)असे करा व्यवस्थापनकिडीचा प्रादुर्भाव असेल तर प्रथम पिकाचे निरीक्षण करावे. ४० ते ५० टक्के पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर पहिली फवारणी निंबोळी अर्क पाच टक्के किंवा घाटे अळीचा विषाणू एचएनपीव्ही हेक्टरी ५०० एलई अधिक ५० ग्रॅम राणीपाल याप्रमाणे करावी. यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होऊन नैसर्गिक मित्र असलेल्या किटकांना अपाय होत नाही. त्यांचेद्वारेही घाटेअळीचे नियंत्रण होण्यास मदत होते. दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. यासाठी निंबोळी अर्क पाच टक्के किंवा एचएएनपीव्ही ५०० एलई यामध्ये क्लिनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली., मिश्र किटकनाशक ट्रायझेफॉस ३५ टक्के अधिक डेज्टामेथ्रीन एक टक्का २५ मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची अर्धी मात्रा मिसळल्यास फायदा होतो, असे कृषी विभागाने सांगितले. या आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन अनुदानावर किटकनाशके उपलब्ध करावीत.- प्रवीण भोजने, शेतकरी, शेंदूरजनाघाटढगाळ वातावरणासोबत दाट धुके किंवा पाऊस असता तर किडींचा अधिक प्रादुर्भाव होतोे. मात्र सध्या अशी स्थिती नाही. थोड्या फार प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. - दत्तात्रय मुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी