शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोंड अळीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:08 IST

२०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे.

ठळक मुद्दे२० हजार ९० शेतकऱ्यांची कपाशी बाधित : १७६ हजार हेक्टरमध्ये नुकसान

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : २०१७ च्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. ही स्थिती राज्यभर सर्वदूर सारखीच असल्याने शासनाने कापूस पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून त्याप्रमाणे अहवालही शासनास सादर करण्यात आला तसेच शासकीय नियमानुसार मदतीसाठी लागणाऱ्यां अनुदानाच्या रकमेचेही मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून मदतीचा हात शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना अजूनही मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.गुलाबी बोंडअळीचा फटका तालुक्यातील २० हजार ९० शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये कोरडवाह क्षेत्रातील ९ हजार १७० शेतकऱ्यांचा, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ९२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचा रीतसर अहवाल स्थानिक तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तिकरीत्या शासनास सादर केला आहे. अहवालानुसार कोरडवाहूच्या ८ हजार २६६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार ९९ हेक्टर इतके क्षेत्र बोंडअळीने ३३ टक्क्यांच्या वर बाधित झाले आहे, तर बागायती क्षेत्रातील १० हजार ५४२ कपाशी पेऱ्यापैकी ८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांच्या वर नुकसानग्रस्त झाले आहे. या सर्वांना शासकीय नियमानुसार मदतीची मागणी शासनाकडे अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.अहवालात प्रचलित शासकीय मदत धोरणानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टर ६ हजार ८०० रुपयांची, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदतीची मागणी करण्यात आली आहे.१५ कोटी ३४ लाखांची मागणीगुलाबी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रासाठी अहवालात १५ कोटी ३४ लाख ७१ हजार ७११ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ४ कोटी १० लाख ६ हजार ८५६ रुपये, तर बागायतीसाठी ११ कोटी २४ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी मदतीचा या अहवालात समावेश नाही.बागायती क्षेत्रातील नुकसान ८ हजार हेक्टरमध्येतालुक्यात एकूण १८ हजार हेक्टरच्या वर कपाशीचा पेरा आहे. सर्वेक्षण अहवालानुसार यापैकी १४ हजार ४०७ हेक्टर कपाशीचे क्षेत्र ३३ टक्के च्या आत बोंडअळीने नुकसानग्रस्त झाले आहे. यात ६ हजार १०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू, तर ८ हजार ३०८ हेक्टर बागायती कपाशीचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त झाले आहे.