शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

आगीपासून बचावासाठी गावपातळीवर जागृती

By admin | Updated: May 7, 2017 00:09 IST

वाढत्या उष्णतामानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आगीपासून नागरिकांचा बचाव होणे,....

पालकमंत्र्यांचे निर्देश : युवकांचे सहकार्य घेणार लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढत्या उष्णतामानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आगीपासून नागरिकांचा बचाव होणे, प्राणहानी व वित्तहाणी टाळण्यासाठी प्रत्येक गावात जनजागृती करण्याचे निर्देश जिल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.महामार्गावर दुतर्फा झाडे जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरातदेखील वृक्षतोड होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश ना. प्रवीण पोटे यांनी दिले आहेत. घराभोवती, झाडालगत किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळू नये. असा प्रकार करताना कोणी नागरिक आढळल्यास त्याचे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यानी दिले.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी यांनी जनतेमध्ये जागृती करावी, ग्रामीण भागात लागनाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवीन्यासाठी स्थानिक युवकांचे सहकार्य घ्यावे असे पालकमंत्र्यानी सूचित केले आहे. जिल्ह्यात कोठेही आगीची घटना घडल्यास १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करावी याविषयी भारत विकास गु्रपच्या जिल्हा समन्वयकांना त्यांनी आदेश दिले आहेत.अशी घ्यावी काळजी, प्रशासनाच्या सूचनाघरासमोर किंवा झाडाजवळ, गुरांच्या गोठ्याजवळ कचरा जाळू नये.स्वत:च्या कपड्याला आग लागल्यास जमिनीवर लोळून विझवावी.सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नये, धुऱ्यावर जाळ करताना काळजी घ्या.जुन्या विजेची तार व जुनी विजेची उपकरणे बदलावी.घरात सार्वजनिक ठिकाणी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग असावा.घरातील हिटर, गॅसपासून कपडे, पडदे, लाकडी वस्तू ३ फूट लांब ठेवाव्या.सिलिंडरचे रेग्यूलेटर बंद ठेवावे, चुलीतील विस्तव विझल्याची खात्री करावी.आग लागल्यास अग्निशमन दलाचा टोल फ्री क्र. १०१ व कार्यालय क्रमांक ०७२१-२५७६४२४ व सर्व नगरपरिषद येथील क्रमांकावर फोन करावा.