शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

लग्नाचे नाटक रचून युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 00:16 IST

लग्नाचे खोटे नाटक रचून सीआरपीएफ जवानाने एका महाविद्यालयीन युवतीचे शारीरिक शोषण केले व नंतर तिला घरी सोडून ...

पीडित युवती : तक्रार घेण्यास पोलिसांचा नकारअमरावती : लग्नाचे खोटे नाटक रचून सीआरपीएफ जवानाने एका महाविद्यालयीन युवतीचे शारीरिक शोषण केले व नंतर तिला घरी सोडून कायमचे पलायन केल्याची तक्रार युवतीने केली आहे. प्रथम तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी कानाडोळा केला. मात्र प्रहार व रिपाइंने हस्तक्षेप केल्यामुळे शुक्रवारी खोलापुरी गेट पोलिसांनी तक्रार घेत न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.तिवसा तालुक्यातील हसनापूर बोर्डा येथील नीलेश गोविंदराव वानखडे हा सध्या सीआरपीएफमध्ये कार्यरत असून सन २०१२ पासून पीडित युवतीला तो ओळखतो. दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे अनेकदा त्याने पीडित युवतीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. परंतु युवतीने त्याकडे कानाडोळा केला.सप्टेंबर २०१६ मध्ये तो काही दिवसांच्या सुटीवर हसनापूर बोर्डा येथे आला असता १४ सप्टेंबर रोजी त्याने सदर युवतीला फूस लावून अमरावती येथे आणले आणि तिला विश्वासात घेऊन अंबादेवी मंदिरात हार घालून लग्न केले. त्यानंतर बुधवारा येथे भाड्याने खोली घेऊन १४ ते २१ सप्टेंबर पर्यंत तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिला हसनापूर येथील घरी घेऊन गेला. मात्र मुलगी दलित असल्याचे समजताच तिला जातीवाचक शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.नीलेश वानखडे याने पीडिताला तिच्या घरी सोडले व दोन दिवसांत परत घ्यायला येतो म्हणून सांगितले. मात्र तो अद्यापही परतला नसल्याने मुलीने कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु कुऱ्हा पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. तक्रार दिल्याचे नीलेशच्या नातेवाईकांना कळताच सर्वांनी पीडिताच्या कुटुंबावर बहिष्कार घातला. कुऱ्हा पोलिसांनी कोणतीच मदत केली नाही. उलट खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. येथेही तीच समस्या निर्माण झाली होती. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची कोणीच दखल घेत नसल्याने अखेर पीडिताने जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे यांच्याशी संपर्क करून रिपाइं व प्रहारच्या माध्यमातून शुक्रवारी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले असून नीलेश वानखडे व त्यांच्या कुटुंबियांवर अ‍ॅट्रॉसिटी व अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जि.प. सदस्य विनोद डांगे प्रहारचे जोगेंद्र मोहोड, गजानन मोहोड, रिपाइंचे अमोल इंगळे यांनी केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी चौकशी आरंभली असून तक्रारकर्त्या महिलेच्या पतीला बोलावून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पुढील दिशा ठरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)पोलीस बेदखल, पीडित कुटुंब दहशतीखालीपीडित युवती व तिच्या कुटुंबीयांवर गावकऱ्यांनी अघोषित बहिष्कार टाकला असून वारंवार जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात येत आहे. कुऱ्हा पोलिसांनी याबाबत काहीच दखल घेतली नसून संपूर्ण कुटुंबीय दहशतीखाली जगत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे.पती-पत्नीच्या वादाची तक्रार प्राप्त झाली आहे. पुढील चौकशी करून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. - अनिल कुरुळकर,ठाणेदार, खोलापुरी गेट ठाणे.