शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

'सुपर'मध्ये उपचार घेताय का? औषधी बाहेरुनच घ्या!; फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:08 IST

मेडिकल स्टोअरकडे धाव : ओपीडीत रोज २०० ते २५० रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे उपचारासाठी दाखल होणारे बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या माघारलेले वा अतिशय सामान्य पातळीवरील असतात. आरोग्यसेवा मोफत करण्यात आल्याने हर्षभरित झालेल्या या रुग्णांना जेव्हा बाहेरून औषध आणण्यासाठी खिशाला कात्री लागते तेव्हा त्यांना होणाऱ्या वेदना आजारापेक्षा दुःखदायी असतात. या स्थितीमुळे 'सुपर'मध्ये औषधांचा तुटवडा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील ओपीडी तसेच भरती असलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या काही औषधी रुग्णालयातून दिली जातात, तर काही औषधी ही उपलब्ध नसल्याचे सांगून ती बाहेरून आणण्याचे सांगण्यात येत आहे. येथे हृदयविकार, कर्करोग, किडनीसंदर्भातील आजार तसेच लहान बालकांच्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे येथे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. अनेक रुग्ण या ठिकाणी रेफरदेखील केले जातात. ओपीडीमध्येही दररोज सरासरी २०० ते २५० रुग्ण तपासणीसाठी येतात. राज्य शासनाच्या धोरणानुसार या रुग्णांना सर्व प्रकारची आरोग्यसेवा तसेच औषधी मोफत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, सुपर स्पेशालिटी येथील डॉक्टरांनीच लिहून दिलेली औषधीच रुग्णालयातील औषध भंडारमध्ये उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागते.

एकाच रुग्णाचा दोन वेळा सिटी स्कॅनविभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे कॅन्सर तसेच इतर आजारांच्या निदानासाठी बहुतांश रुग्णांना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, रुग्णालयात सिटी स्कॅन असतानादेखील ते बंद असल्याचे सांगून रुग्णांना बाहेरून सिटी स्कॅन करण्यास सुचविले जाते. एकाच रुग्णाचा दोन वेळा सिटी स्कॅन करण्यात येत असल्याचा प्रकारही रुग्णालयात पाहायला मिळत आहे. एका महिला रुग्णाचे सोमवारी सिटी स्कॅन केल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी अहवाल घेण्यासाठी बोलविण्यात आले होते. परंतु, मंगळवारी अहवाल घेण्यासाठी आलेल्या महिलेला सिटी स्कॅन चुकल्याने पुन्हा सिटी स्कॅन करण्यास सांगण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटलmedicinesऔषधं