शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोरच पशुंची कत्तल

By admin | Updated: January 22, 2015 00:04 IST

ज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत...

सुरेश सवळे  चांदूरबाजारज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत हद्दीतील बहिरम येथे धार्मिकस्थळी घाणीच्या साम्राज्यात आपल्या अस्तित्वावर अश्रू ढाळीत आहे. याच पुतळ्यासमोर ढाबा उभारण्यास परवानगी देण्यात असून तेथे रोज बकऱ्यांची कत्तल केली जाते. इतकेच नव्हे तर शेजारी असलेल्या ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीतील दूषित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र या गंभीर बाबींकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही, ही शोकांतिका आहे. अख्या विदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील ऐन हिवाळ्याच्या मोसमात भरणारी बहिरम यात्रा हंडी, ब्रॅन्डी व तमाशासाठी ओळखली जात होती. येथे दररोज शेकडो बोकडांची कत्तल केली जाते. तमाशा या यात्रेचा केंद्रबिंदू होता. तमाशगीर महिलांव्दारे त्याकाळी २६ जानेवारीला होणारे झेंडावंदन वर्तमानपत्रावर पहिल्या पानावर झळाकायचे. गाडगेबाबांनी येथे समाजप्रबोधनाचे कीर्तन करुन येथील प्राण्यांच्या बळीला पायबंद घातला. त्यांचा आदर्श जागृत करण्यासाठी सन १९७१ मध्ये अमरावतीच्या तत्कालीन अनंत कॅम्पचे संचालक अजाबराव ठाकरे यांनी बहिरम यात्रेतील भगवान बाबा संस्थानच्या समोरील जागेत गाडगेबाबांचा पुतळा बसविला. याच परिसरातील १९७२ मध्ये पुंडलीकराव घोम यांनी दत्ताचे मंदिर बांधले. मूर्तीचे हात तुटल्यामुळे २००९ मध्ये परतवाड्याचे नगराध्यक्ष सचिन देशमुख यांनी दत्ताची नवीन मूर्ती बसविली. शिरजगाव कसबा येथील रामचंद्र वांगे यांनी त्यावेळी स्वत:च्या मालकीचे पाच एकर शेत विकून आलेल्या पैशातून दत्त मंदिरासमोर भाविकांना बसण्याकरिता टिनशेड व सभागृह बांधले. आज त्या टिनशेडचा केवळ सापळा तेवढा शिल्लक आहे.एवढी वर्षे आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या धार्मिकस्थळी शाकाहारी व मांसाहारी ढाब्याची परवानगी देण्यात आली. या ढाब्यासाठी नाहरकरत प्रमाणपत्र देताना सदर जागा यात्रेकरू व बाजारासाठी राखीव असल्याने ढाब्यासाठी परवानगी देता येत नाही, असा शेरा तत्कालीन कारंजा (बहिरम) ग्रामपंचायतीच्या सचिवाने दिल्यानंतरही तत्कालीन सरपंचाने ढाबा उभारण्यासाठी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी परवानगी दिल्याची माहिती बहिरम संस्थानचे सुरेंद्र पाटील यांनी दिली. या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ३० नोव्हेंबर २०११ रोजीपर्यंत होती. त्यामुळे मुदत संपल्याची नाटीस ग्रामपंचायतीव्दारे संबंधित मालकांना देण्यात आली. तरीसुध्दा ढाबा मालकाने ढाबा न हटविता पक्के बांधकाम केले. त्यामुळे ग्रामपंचाय व पंचायत समिती प्रशासनाने याविरुध्द न्यायालयात धाव घेतली. त्यावर ढाबा मालकाने स्थगनादेश मिळवून ढाबा अद्ययावत सुरू ठेवल्याची माहिती आहे. हा ढाबा अतिक्रमित जागेत उभारल्याची चर्चा आहे. ढाब्याच्या बाजूला केशवराव अढाऊ यांनी सन १९७१ मध्ये बांधलेल्या विहिरीत अंड्याची टरफल्ं टाकली जातात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.