शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

राज्यातील वनविभागात 'रेड अलर्ट' जारी,  नागरिकांच्या सहकार्याने जंगल बचाव मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:15 IST

राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- नरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १५ जूनपर्यंत 'रेड अलर्ट असून, जंगलात आग विझवण्यासोबत नागरिकांच्या सहकार्याने ती लागूच नये, अशी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.           कोट्यवधी रोपांची वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगलाची दरवर्षी राखरांगोळी होते. यात सरपटणा-या प्राण्यांपासून जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू होतो. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होत असताना पर्यावरणाचे सर्वाधिक प्रमाणात नुकसान होते. जंगलात लागणा-या आगी मानवनिर्मित व नैसर्गिक असतात. आतापर्यंतच्या पाहणीत आगी मानवनिर्मितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आगी रोखण्यासाठी क्षेत्रीय वनकर्मचारी ते वनाधिकारी यांनी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती प्रसार, प्रचार करून वनव्यवस्थापन समित्या व गावातील नागरिकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना वनविभागाच्यावतीने राज्यभर देण्यात आल्या आहेत. 

जाळरेषा जाळण्याचे काम संपलेवनवणवा हंगामांतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत जाळरेषा कापणे व जाळणे ही आगीपासून संरक्षण मिळवणारी कामे प्रत्येक वनक्षेत्रातील वनखंड ते जिल्हा व आंतरराज्य महामार्गावरील जंगलातील सीमारेषेवर करण्यात आली. प्रत्येक वनखंडात ६ मीटर, आंतरराज्य व जिल्हा सीमारेषेवर १२ मीटरपर्यंत जाळरेषा जाळण्यात आल्या. लागलेली आग पुढे पसरू नये, यासाठी अखंड गवताच्या परिसरात रस्त्याच्या आकाराचा काडीकचरा जाळण्यात येतो, त्यालाच जाळरेषा म्हणतात. हे काम आता संपल्याचे वनाधिकाºयांनी सांगितले.

सॅटेलाइटहूून आगीची माहितीवनकर्मचा-यांनी जंगलात आग लागल्याची माहिती ठेवण्यासोबतच ती कुठे लागली, ही नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित उपवनसंरक्षक व वरिष्ठ अधिका-यांना सर्वे ऑफ इंडियाकडून सॅटेलाईटद्वारे माहिती पाठविली जाते. परंतु काही वर्षांत मेळघाटसह राज्यातील काही भागात जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याचे सत्य आहे. ते कमी करण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढे येणे गरजेचे आहे. जंगलात आगी लागू नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून मदत घेण्यासोबत १५ जूनपर्यंत फायर सिझनमध्ये वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचाºयांनी सतर्क राहण्याचे आदेश आहेत. १५ फेब्रुवारी रोजी जाळरेषा जाळण्याचे काम संपले आहे. राहिलेली कामे डीसीएफच्या परवानगीने नव्याने करता येईल. - प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग, अमरावती