वरुड : सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेल्या वरुड तालुक्यात यंदा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने तालुक्यातील आठ लघुसिंचन प्रकल्प भरले आहेत.यामध्ये बेलसावंगी तांत्रिक दृष्टया सदोष असल्याने जलसंचय होत नाही. पंढरी प्रकल्पात ९० टक्के जलसंचय झाल्याने यावर्षी पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याचे सांगण्यात येते. यावर्षी पावसाने दीड महिन्यांपासून दडी मारल्याने नदी- नाल्यांना पूर आला नाही. तालुक्यातील प्रकल्पसुध्दा कोरडे पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आॅगस्ट महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने प्रकल्पातील जलस्तर वाढला .तालुक्यातील ९ प्रकल्प रबी हंगामासाठी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून सिंंचनाच्या सोई उपलब्ध करुन देण्यात आल्या. गत काही वर्षांपासून खालावलेली भूजल पातळी पुन्हा वाढू लागली होती. मात्र यावर्षी प्रकल्पाची पाण्याची पातळी खालावत आहे. तालुक्यामध्ये ९ मध्यम प्रकल्प असून सर्वात मोठा प्रकल्प शेकदरी आहे. शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १०० टक्के जलसंचय झालेल्या प्रकल्पांमध्ये शेकदरी प्रकल्प पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पांमध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४६१.७७ मीटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ५००.७५ मीटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, जामगाव प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे. या प्रकल्पावर वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झाली आहेत. पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर आहे. या प्रकल्पामध्ये ९० टक्के जलसंचय झाला आहे. बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर आहे. तांत्रिकदृष्टया सदोष असल्याने यामध्ये जलसंचय हाऊ ूशकत नाही. त्यामुळे हा प्रकल्प रिकामाच असतो. याव्यतिरीक्त शेंदुरजनाघाट, धनोडी, मालखेड या गावाला पाणीपुरवठासुध्दा केला जातो. याव्यतिरीक्त पाकनाला, नागठाणा-२, ही प्रकल्प फूल्ल झाली असून यामध्येसुध्दा १०० टक्के जलसाठा संचयित झाला आहे. पाकनाला प्रकल्पाच्या दारंमध्ये तांत्रिक दोष असल्याने साठवलेले पाणी टिकेल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. याव्यतिरीक्त भेंमडी, झटामझिरी, दाभी, पंढरी (मध्यम), बहादा आणि पवनी मध्यम प्रकल्पाचे काम सुरु असून काही कामे रखडलेले असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पावर १४ पाणी वापर संस्था कार्यान्वित असून संत्रा, मोसंबीसह रबीच्या सिंंचनासाठी जलसाठे महत्त्वाचे ठरते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या वरुड तालुक्यात सिंचनाची सुविधा असल्याने जलस्तर वाढविण्याकरिता या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
१० पैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो
By admin | Updated: September 8, 2014 00:58 IST