शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

रस्त्यांसाठी पालिकांना ५० कोटींचा निधी

By admin | Updated: March 29, 2017 00:29 IST

जिल्ह्यातील दहा नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना रस्ते विकास निधीतंर्गत ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे ....

पालकमंत्री : जिल्हा वार्षिक योजनेचा आढावाअमरावती : जिल्ह्यातील दहा नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना रस्ते विकास निधीतंर्गत ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज नियोजनभवनातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत सांगीतले.दहा नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी राज्य शासनाला ४७५ कोटींचा डीपीआर विकास आराखडा सादर केला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकांना थेट निधी मिळावा म्हणून केंद्राकडे प्रस्ताव सादर केला आहे तो मंजूर झाल्यास आॅगस्ट २०१८ पर्यत ११५ ते १५० कोटींचा निधी मिळणार आहे. फक्त रस्ते बांधण्याऐवजी पेयजल व इतर सुविधाकडे नगरपालिकांनी लक्ष द्यावे. मुख्याधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी समन्वयाने काम करण्याची सूचना त्यांनी केली.पुढील काही दिवसांत प्रत्येक नगरपालीकास्तरावर जाऊन बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नगराध्यक्षांना १५ लक्ष व उपाध्यक्षांना १० लक्ष रुपये निधी देण्यात येणार आहे. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह अंजनगावचेनगराध्यक्ष कमलाकांत लाडोळे, अचलपूर नगराध्यक्ष सुनीता फिस्के, चांदूरबाजार नगराध्यक्ष रवींद्र पवार, मोर्शी नगराध्यक्ष शीला रोडे, वरूड नगराध्यक्ष स्वाती आंडे, धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड, धारणी नगराध्यक्ष रजीयाबी मो.सर्फुद्दीन, प्रशासन अधिकारी वाहुरवाघ उपस्थित होते. पश्चिम विदभार्तील चिखलदरा नगरपरिषद ही हागणदारीमुक्त नगरपरिषद आहे. त्याचप्रमाणे इतर नगरपालिकांनी १०० टक्के स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यातील पालिकांनी त्यांना दिलेल्या निधीचा वापर करावा. आचारसंहितेमुळे निधी वापराला मयार्दा आल्यात. पुढील वर्षी मात्र लवकर निधी देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. जिल्ह्यात १८२ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. १२ हजार शासनाचे व ५ हजार न.प.चे असे १७ हजार रुपयांचे अनुदान आता शौचालय बांधण्यासाठी मिळते. नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी काही सूचना यावेळेस केल्या. संचालन व आभार प्रदर्शन दर्यापूर पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी केले. (प्रतिनिधी)