पान २ ची बॉटम
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या काळात रस्त्यावर असलेला व्यवसाय मोडकळीस आला. अशात पालिकेने दहा हजार रुपये म्हणून कर्जाऊ दिले. त्यातून शहरातील २२७ पथविक्रेत्यांना आर्थिक बळ मिळाले.
भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे यांनी शहरातील २२७ पथविक्रेत्यांना कोरोनाच्या काळात मदतीचा हात दिला. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत हा सूक्ष्म कर्जपुरवठा करण्यात आला. या योजनेंतर्गत प्रत्येकाने डिजिटल व्यवहार करावे, यासाठी बँकेने नुकतेच आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकाराने नगरपरिषद येथे पथ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. पथ विक्रेते डिजिटल झाल्यास व एका व्यवहारामागे एक रुपये कॅश बॅक ऑफर दिली. महिनाभरात एक हजार व्यवहार डिजिटल झाल्यास रुपये एक हजार कॅश बॅक स्वरूपात मिळतात. अशा प्रकारे दहा हजार रुपये कर्जाची ९५० रुपये मासिक किस्त ही स्वत:हून न भरता, या स्वरूपात भरणे सोयीचे आहे, अशी माहिती या प्रशिक्षण कार्यशाळेत विनायक कुराडे यांनी दिली. पथविक्रेत्यांना आपले कर्ज भरण्यासाठी कॅशलेस व्यवहार नवसंजीवनी ठरणार असल्याचे मार्गदर्शन वैभव जवंजाळ यांनी पथविक्रेत्यांना केले. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक ब्रिजेश कुमार, संजय तिवारी, पंकज मसूरकर, राजेंद्र धनस्कार, सीमा काटकर, मुरलीधर कडू, स्वाती मेश्राम, पुंडलिक कुंबरे, संजय दहातोंडे, महेश नक्षणे, रक्षा राठी, वैशाली खंदारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रकल्प अधिकारी किशोर बागवान यांनी केले.
-----------------