------------------------------------------------------------------------------
फ्रेजरपुरा हद्दीत जुगार पकडला
अमरावती: फ्रेजरपुरा पोलिसांनी चपराशीपुरानजीक आठवडी बाजाराच्या खुल्या जागेत धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. मोहित दीपक शर्मा (२२, रा. बियाणी चौक), शेख उफरान शेख उस्मान (४२, रा. बिच्छुटेकडी), अमोल विनायक इंगळे (३७, रा. पंचशीलनगर), किशोर माणिकराव चव्हाण(४०, रा. वडाळी) व अन्य दोन आरोपी युवकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------------------------------------------------
सक्करसाथमध्ये जुगार पकडला
अमरावती : खोलापुरीगेट पोलिसांनी सक्करसाथ येथील लखोटीया गल्लीत सोमवारी कारवाई करून वरली मटका जुगाराच्या साहित्यासह १० हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी उदय नंदकिशोर शर्मा (३२, रा. लखोटिया गल्ली), सचिन मु्न्ना शर्मा( रा. लखोटिया गल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------------------------------------------
महादेवखोरीत अवैध दारू जप्त
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी महादेवखोरी येथे कारवाई करून ६०० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. भीमराव दामोदर गडलिंग (४०, रा. महादेवखोरी) असे आरोपीचे नाव आहे.
-----------------------------------------------------------------------------
२५ हजारांची दारू जप्त
अमरावती: फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील महादेवखोरीत धाड टाकून अवैधरीत्या विक्री होत असलेले दारू व दुचाकी असा एकूण २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. आरोपी सुधीर इश्वर पांडे (३२, रा. कंवरनगर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------------------------------------------
अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जखमी
अमरावती : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक इसम जखमी झाल्याची घटना बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील गौरखेडा येथे सोमवारी रात्री घडली. संजय लक्ष्मण बांडे (४०) असे जखमीचे नाव आहे. ते परलाम येथे गेले होेते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाल्याचे जखमीच्या पत्नीने बडनेरा पोलिसांना सांगितले.
----------------
नानाभाई सोनी
फोटो - ०५ एस निधन
अमरावती : सराफा व्यावसायिक नानाभाई सोनी (६७, रा. प्रताप चौक) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात मुलगा दुष्यंत व बराच मोठा आप्तपरिवार आहे.