शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

ऑनलॉईन वेतन डाटा पाठविण्याची १0 मे ची 'डेडलाईन'

By admin | Updated: May 9, 2014 01:02 IST

येत्या शैक्षणिक सत्रापासून शिक्षकांचे ऑनलाईन वेतन प्रणाली लागू करायची असल्याने शिक्षकांच्या वेतनासंबंधित माहिती १0 मे पर्यंत पाठविणे अनिवार्य आहे.

अमरावती : येत्या शैक्षणिक सत्रापासून शिक्षकांचे ऑनलाईन वेतन प्रणाली लागू करायची असल्याने शिक्षकांच्या वेतनासंबंधित माहिती १0 मे पर्यंत पाठविणे अनिवार्य आहे. त्यानुसार शिक्षण संचालकांनी यंत्रणेला निर्देश दिले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर महापालिक ा शिक्षण विभाग कामाला लागला असून बहुतांश माहितीचा डाटा पाठविण्यात आला आहे.पुणे येथे शिक्षण विभागाने राज्यभरातील शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत शिक्षणाशी संबंधित असलेल्या ६८ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तारांकित, अतारांकित, लोकायुक्त, न्यायालयीन बाबी, शिक्षण अनुदान, संच मान्यता, परिवहन समिती, शालेय पोषण आहार, आरटीई नुसार शाळा तपासणी, सेवा ज्येष्ठता, बिंदू नामावली, शालार्थ, ऑनलाईन वेतन प्रणाली आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषत: शिक्षकांच्या ऑनलाईन वेतन प्रणालीत कोणत्याही त्रुट्या राहू नये, यासाठी निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाने ६१ प्राथमिक तर ५ माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती पाठविण्याची तयारी चालविली आहे. बहुतांश शिक्षकांची माहिती पाठविली आहे. काही शिक्षकांची माहिती पाठविणे बाकी असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.२५ शाळांची माहिती पाठविलीमहापालिकेने ६५ शाळांपैकी २५ शाळांची माहिती मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पाठविली आहे. उर्वरित शिक्षकांची माहिती पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शाळा निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले. ३९४ शिक्षकांची माहिती पाठविणे, त्रुट्या राहू नये, यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. काही विषयांवर शासनाचे मार्गदर्शन मागविले आहे. ते प्राप्त होताच शिक्षकांची माहिती पाठविली जाईल, असे पाटील म्हणाले.