शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोल्यातील युवा नेत्रतज्ज्ञाच्या ऑटोमॅटिक टाका मारण्याच्या यंत्राला पेटंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 11:03 IST

- नितीन गव्हाळे अकोला : डोळ्यांशी संबंधित आजार, रेटिना शस्त्रक्रियेमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धत वापरली जाते. बुबुळापासून ठरावीक अंतरावर तीन-चार ...

ठळक मुद्देरेटिना सर्जरीमध्ये युवा नेत्रतज्ज्ञाचे संशोधन: केंद्र शासनाकडून पेटंटला मंजुरी

- नितीन गव्हाळे

अकोला : डोळ्यांशी संबंधित आजार, रेटिना शस्त्रक्रियेमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धत वापरली जाते. बुबुळापासून ठरावीक अंतरावर तीन-चार चिरे मारून डाेळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यासाठी टाके मारावे लागतात. टाका लावल्यानंतर ते टाके विरघळण्यास ४०-४५ दिवस लागतात. डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्या होऊ नयेत, तसेच शस्त्रक्रियेनंतर ३-४ दिवसांतच रुग्ण बरा व्हावा. या दृष्टिकोनातून अकोल्यातील युवा नेत्रतज्ज्ञाने रेटिना सर्जरीमध्ये ऑटोमॅटिक यंत्र तयार करण्याबाबत संशोधन करून वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडविला आहे. त्यांच्या या संशोधनाला केंद्र शासनाच्या पेटंट विभागाने मंजुरी दिली आहे. संशोधन करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे, डॉ. सुनील मोतीराम भड. सुनील यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या ग्रामीण भागातील शाळेत झाले. उच्चशिक्षण शिवाजी कॉलेजमधून झाले. त्यानंतर सुनील यांनी यवतमाळ येथून एमबीबीएस केले. वैद्यकीय पूर्व परीक्षेसाठी सुनीलला अकोल्यातील प्रा. प्रशांत देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनातच त्यांना यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. नागपूरला एमएस (नेत्ररोग) केले. राज्यातून त्यांनी दुसरा क्रमांक प्राप्त केला होता. त्यांचे वडील मोतीराम भड हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. पुढे तामिळनाडू राज्यातील जगातील सर्वात मोठ्या अरविंद आय हॉस्पिटलमधून रेटिना सर्जरी सुपरस्पेशालिटीचे शिक्षण पूर्ण केले. नेत्ररोग व रेटिना विषयावर त्याचे आंतरराष्ट्रीय लेख प्रकाशित झाले आहेत. जागतिक अंधत्वाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुनीलने संशोधनास सुरुवात केली. रेटिना सर्जरीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ए डिवाइस फॉर स्क्लेरोटॉमी सुटुरिंग या उपकरणावर यशस्वी संशोधन केले. या संशोधनाला केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाने मान्यता व पेटंटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या संशोधित उपकरणामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन्सचा वेळ वाचेल आणि नेत्र रुग्णांचा त्रास कमी होणार आहे.

उपकरणामुळे शत्रक्रिया होईल सोपी!

पारंपरिक रेटिना शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर, बुब्बुळापासून डोळ्याच्या मागील भागात उपकरणाद्वारे ठरावीक अंतरावर तीन-चार चिरे मारण्यात येतात. त्यासाठी चिरे मारलेल्या भागाला प्रत्येकी एक टाका द्यावा. टाका दिल्यानंतर टाके बरे व्हायला ४०-४५ दिवस लागतात. दरम्यान, रुग्णांना अनेक समस्या उद्‌भवतात. या संशोधित उपकरणामुळे घेतलेला टाका आतमध्ये घेतला जाणार व डोळ्याच्या बाहेर उघडा राहणार नाही. त्यामुळे रुग्णाला डोळा लाल होणे, पाणी येणे, रक्तस्त्राव होणे, टाक्याच्या जागी गाठ होणे, जंतुसंसर्ग होणे आदी त्रास होणार नाही. रुग्ण ३-४ दिवसांत टाक्यांपासून मुक्त होईल.

डॉक्टरांना होईल मदत

डॉक्टरांच्या बाजूने पाहिलेतर पारंपरिक टाके मारण्यासाठीसुद्धा कौशल्य, निपुणता लागते. कितीही मोठा सर्जन असला तरी त्यालासुद्धा ३-४ टाके मारायला ८-१२ मिनिटे लागतात. या संशोधित उपकरणामुळे नवीन सर्जनसुद्धा गुंतागुतींची शस्त्रक्रिया सहजरीत्या करू शकेल आणि त्याचाही वेळही वाचेल.

 

रेटिना सर्जरीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ए डिवाइस फॉर स्क्लेरोटॉमी सुटुरिंग या उपकरणावर यशस्वी संशोधन केले. त्याला यश मिळाले आहे. केंद्र शासनाने संशोधनाला मान्यता देत, पेटंटला मंजुरी दिली आहे. या संशोधन व उपकरणामुळे नेत्र रुग्णांचा त्रास कमी होईल व नेत्रतज्ज्ञांचा वेळ वाचेल.

-डॉ. सुनील मोतीराम भड, नेत्ररोगतज्ज्ञ

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टर