शेगाव : मातंग समाजातील एका व्यक्तीने हमाली करुन आपल्या मुलाला बी.डी.ओ. केले. पुढे त्याच बी.डी.ओ ने वडीलांच्या आर्थिक परिस्थितीची जाण ठेवत आपल्या मुलास डॉक्टर केले. या डॉक्टरचे आगमन होताच नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले.विशेष म्हणजे हे स्वागत शेगावातील मातंग समाज बांधवांच्या पहिल्या डॉक्टरचे होते. शेगावचे सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक तायडे यांचा मुलगा डॉ.अक्षय तायडे हा एम. बी. बी. एस.पदवी व इंटरशिप करुन पहिल्यांदाच शेगावला परतला. डॉक्टर झाल्यानंतर गावी आलेल्या त्या मुलाच्या स्वागतासाठी रेल्वेस्थानकावर तुतारीच्या निनाद व ढोल ताशांचा गजर होत असताना नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.यावेळी अशोक तायडे, गजानन वानखडे, रत्नाबाई वानखडे, इंदुबाई गवई, गोदावरी हिवराळे, सापुर्डा खंडारे व समाजबांधव उपस्थित होते.
मातंग समाजातील पहिल्या डॉक्टरचे स्वागत
By admin | Updated: August 13, 2014 00:11 IST