शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर; चौकीदारांची रखवाली नावापुरतीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:03 IST

तीन जलकुंभ रामभरोस: जलप्रदाय विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोलेकरांना शहरातील १३ जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. जलकुंभांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागात आस्थापनेवर असणाऱ्या चौकीदारांची नियुक्ती करण्यात आली असली तरी यातील काही चौकीदार केवळ नावापुरतीच रखवाली करीत असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघडकीस आले. १३ पैकी तीन जलकुंभांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असून, जलप्रदाय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरात १३ ठिकाणी जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे. महान धरणातून पाण्याचा उपसा केल्यानंतर ६५ व २५ एमएलडीच्या दोन जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी स्वच्छ केले जाते. मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविण्यात येते. पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी जलप्रदाय विभागाने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे झोन निर्माण करून कनिष्ठ अभियंत्यांकडे देखरेखीची जबाबदारी सोपवली आहे. वेळापत्रकानुसार मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व उघडून जलकुंभांमध्ये पाणी भरणे, नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासह जलकुंभांची सुरक्षा राखण्यासाठी जलप्रदाय विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जलकुंभांच्या सुरक्षेसाठी चौकीदार असतानासुद्धा रात्री-अपरात्री सदर आवारात असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याचे पाहून मनपा प्रशासनाने शहरातील सर्व जलकुंभांसाठी आवारभिंती उभारल्या. यामुळे मोकाट जनावरे, डुकरे, कुत्र्यांचा मुक्त संचार कमी होण्यासोबतच टवाळखोरांचा वावर कमी झाला. असे असले तरी १३ पैकी तीन जलकुंभांवर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याचे स्टिंग आॅपरेशनदरम्यान आढळून आले. हरिहरपेठ भागातील एक आणि शिवनगरमधील दोन अशा तीन जलकुंभांची सुरक्षा रामभरोसे असून, हरिहरपेठमधील जलकुं भाची सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नसल्याचे दिसून आले. मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून मनपाचे कर्मचारी गायब असल्याचे चित्र होते. शिवनगरमधील दोन जलकुंभांच्या सुरक्षेसाठी चौकीदार असला तरी प्रवेशद्वार सताड उघडे होते. संबंधित चौकीदाराला आवाज दिला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद न देणे पसंत केले. यावरून चौकीदार किती दक्ष राहतात, याचा यानिमित्ताने प्रत्यय आला. हरिहरपेठस्थित जलकुंभाकडे दुर्लक्ष का?जुने शहरातील हरिहरपेठस्थित जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कागदोपत्री दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कर्मचारी रात्रभर सेवारत राहत नसल्याची माहिती आहे. या ठिकाणी खोली बांधून कायमस्वरूपी चौकीदार नियुक्त करण्याची गरज आहे.पथदिव्यांची तोकडी व्यवस्था!मध्यंतरी मनपा प्रशासनाने ११ कोटी ८४ लाख रुपयांतून जलकुंभांना आवारभिंत, जलवाहिन्या बदलण्याची कामे केली. शिवनगरमध्ये दोन जलकुंभ असून, आवारात केवळ दोन ट्युबलाइट लावण्यात आले आहेत. या ठिकाणी एलईडी लाइट बसविण्याची नितांत गरज आहे. या ठिकाणी आढळले चौकीदार!नेहरू पार्क, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, आदर्श कॉलनी, स्टेशन चौक, महाजनी प्लॉट, केशवनगर, व्हीएचबी कॉलनीस्थित जलकुंभांच्या ठिकाणी चौकीदार हजर असल्याचे आढळून आले.