अकोला: केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामातील धान्यसाठा संपुष्टात आला असून, शिल्लक असलेला जुना सात हजार मेट्रिक टन धान्यसाठा निकृष्ट असल्याने उचल करणे शक्य नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ इत्यादी धान्यसाठा वितरित करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील देशमुख फैलस्थित गोदामामातून धान्याची उचल केली जाते. या गोदामातील धान्य जिल्हय़ातील तालुकास्तरावर शासकीय गोदामांना पुरवठा करण्यात येते; मात्र केंद्रीय वखार महामंडळाच्या या गोदामातील धान्यसाठय़ात अफरातफर झाल्याची बाब गेल्या मार्च महिन्यात उघडकीस आली होती. त्यामुळे या गोदामातील धान्यसाठा निरंक करण्याचा आदेश केंद्रीय वखार महामंडळाच्या दिल्ली येथील कार्यालयामार्फत देण्यात आला होता. त्यानुसार गोदामातील धान्यसाठा ह्यझिरोह्ण करण्यात येत आहे. सध्या या गोदामात शिल्लक असलेला ७ हजार मेट्रिक टन धान्याचा साठा दोन वर्षांंपूर्वीचा जुना आहे. हा धान्यसाठा उचल करण्यास योग्य नसल्याने, जिल्हा पुरवठा विभागामाकडून या गोदामातून होणारी धान्याची उचल गेल्या आठवड्यापासून बंद करण्यात आली आहे. निकृष्ट धान्यसाठय़ाची उचल पुरवठा विभागामार्फत बंद करण्यात आल्याने, गोदाम व्यवस्थापनापकडून उचल करण्यास अयोग्य असलेला धान्यसाठा कोंबड्यांच्या खाद्यासाठी 'पोल्ट्री फार्म' करिता वितरित करण्यात येत आहे.
‘वखार’च्या गोदामातील धान्यसाठा निकृष्ट
By admin | Updated: August 12, 2014 21:11 IST