शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आज मतदान!

By admin | Updated: January 27, 2015 23:14 IST

पालघर जिल्हापरिषदेच्या ५७ गट व त्याअनुषंगाने येणाऱ्या ८ पंचायत समित्यांच्या ११४ गणासाठी बुधवारी मतदान होणार आहे

पालघर : पालघर जिल्हापरिषदेच्या ५७ गट व त्याअनुषंगाने येणाऱ्या ८ पंचायत समित्यांच्या ११४ गणासाठी बुधवारी मतदान होणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाच्या सामुग्रीचे वाटप पूर्ण झाले असून ९ लाख ७३ हजार १९५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदान प्रक्रियेसाठी १६०८ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर १७३९ मतदान केंद्राध्यक्ष व ५३०६ मतदान अधिकारी व १७६९ इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २२८ झोनल अधिकारी ही नियुक्त करण्यात आले आहेत.जि. प. च्या ५७ गटासाठी २४५ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या ११४ गणासाठी ४८० उमेदवार असे एकूण ७२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भविष्य अजमावत आहेत. या निवडणुकीत ४ लाख ७४ हजार ३३० महिला तर ४ लाख ९८ हजार ८८४ पुरूष असे एकूण ९ लाख ७३ हजार १९५ मतदार उद्या मतदान करणार आहेत. जि. प. च्या ५७ गटापैकी ३४ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले असून १५ जागा मागासप्रवर्ग तर बोईसर जवळील पास्थळ हा गट मात्र अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर सर्वसाधारण उमेदवारासाठी फक्त ७ जागा खुल्या ठेवण्यात आलेल्या आहेत. जि प. मधील ५७ गटापैकी पालघर तालुक्यात १७ गट, डहाणू तालुक्यात ६ गट, विक्रमगड, जव्हार, तलासरी व वाड्यात अनुक्रमे ५ गट वसईमध्ये ४ गट तर मोखाडा मध्ये ३ गट अशी विभागणी करण्यात आली आहे. पालघर जिल्हयातील मतदान प्रक्रियेसाठी १९० बसेस, २४ मिनी बसेस, २३२ जिप, ४ टेम्पो, ३ बोटी, ५४ सहा आसनी रिक्षा तर ही निवडणूक प्रक्रियेत कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पोलीस अधिक्षकांच्या नियंत्रणाखाली ६ उपविभागीय पोलीस अधिकारी १०० पो. नि. सहा. पो. नि. व उप . पो. नि. २१४५ पोलीस, २ दंगल नियंत्रण गाड्या, राज्य राखीव दल, नियुक्त करण्यात आले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतल्याने ती चुरशीची होणार आहे.