अकोला: विदर्भातील ख्यातिप्राप्त नागपुरी संत्र्याला भौगोलिक निर्देशन मिळाल्यानंतर या संत्र्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळाली आहे. या संत्र्याचे उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आता माहिती-तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. विदर्भातील नागपुरी संत्र्याला स्वतंत्र ओळख मिळाल्यानंतर या संत्र्याच्या उत्पादन वाढीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी शेतकर्यांच्या शेतावर घनदाट लागवड पद्धतीचा पथदश्री प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हेक्टरी २५ टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट या विद्यापीठाने समोर ठेवले होते. यात काही अंशी यश प्राप्त होत आहे. विदर्भात जवळपास १ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र आहे; परंतु या संत्र्याचे उत्पादन हेक्टरी ३ ते १0 टन एवढेच र्मयादित आहे. १0 टन उत्पादन फार कमी शेतकरी घेतात. देश-विदेशात मागणी असलेल्या या संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकर्यांना ते दिलासादायक ठरणार असल्याने या संत्र्यावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. इंडो-इस्त्रायल या नावाने नागपूर, अमरावती येथील शेतकर्यांच्या शेतावर प्रकल्प राबवला आहे. विदर्भातील संत्राफळाचे उत्पादन वाढवायचे असल्याने माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकर्यांनाही मार्गदर्शन करावे लागणार आहे. संत्रा या पिकावर डिंक्या व मूळकुज रोगाचा होणारा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. जास्त पाणी दिले म्हणजे जास्त उत्पादन होते, असा जो समज रू ढ आहे, त्यावर प्रबोधन करणे क्रमप्राप्त असून, हेच या रोगाचे मूळ कारण असल्याचे शेतकर्यांना समजावून सांगावे लागणार आहे. यासाठीचे पाऊल कृषी विद्यापीठाने उचलले असून, या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाच दिवस मंथन होत आहे. त्यासाठी राज्यातून या विषयावरील शास्त्रज्ञ येथे आले आहेत.
विदर्भातील संत्रा फलोत्पादनावर भर!
By admin | Updated: March 17, 2016 02:35 IST