शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ३२१ जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 20:13 IST

CoronaVirus News आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६२ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६२ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २७९, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ४२ अशा एकूण ३२१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १५,१२४ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३९७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १११८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील १३, अकोट येथील ११, कौलखेड येथील १०,तेल्हारा येथील नऊ, जठारपेठ येथील आठ, गौरक्षण रोड येथील सात, सिंधी कॅम्प येथील पाच, जीएमसी, जूने शहर, जवाहर नगर, तापडीया नगर, मलकापूर व पातूर येथील प्रत्येकी चार, शास्त्री नगर, डाबकी रोड, भौरद, केतन नगर व जूने राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पोपटखेड, रामदासपेठ, गीता नगर, मोठी उमरी, पैलपाडा, लहान उमरी, मलकापूर, खेलदेशपांडे, राऊतवाडी, खरप व इनकम टॅक्स येथील प्रत्येकी दोन, गोकूल कॉलनी, अनिकेत, शिवाजी नगर, खडकी, तारफैल, महसूल कॉलनी, दिवेकर चौक, बाळापूर, आळसी प्लॉट, बायपास, वृदावन नगर, जामठी बु., लक्ष्मी नगर, निपान, खदान, देवर्डा, परीवार कॉलनी, गायत्री नगर, आंबेडकर नगर, किर्ती नगर, शालीनी टॉकीज, पाटील मार्केट, वृंदावन नगर, आदर्श कॉलनी, व्हीएबी कॉलनी, सुधीर कॉलनी, गुडधी, पत्रकार कॉलनी, रतनलाल प्लॉट, पंचायत समिती, गोडबोले प्लॉट, आनंद नगर, गुलजार पुरा, दिपक चौक, केशव नगर, शिवाजी नगर, हरिहरपेठ, नरसिंगपूर, उंबरखेड, व्याळा, हिवरखेड, हिंगणा बु., व घोडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्ण आहेत. सायंकाळी अकोट येथील ३५, बोरगाव मंजू येथील १४, एमआयडीसी येथील आठ, कपिलवास्तू येथील सहा, सुधीर कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, वरुड व खडकी येथील प्रत्येकी चार, मलकापूर येथील तीन, मोठी उमरी, जीएमसी, दोनवाडा, कळंबेश्वर, रजपूतपुरा व पातूर येथील प्रत्येकी दोन, कापशी रोड, देवी खदान, संत नगर, गीता नगर, देशमुख फैल, कौलखेड, न्यु तापडीया नगर, शास्त्री नगर, कॉग्रेसनगर, जज क्वार्टर, समता नगर, जूने शहर, डाबकी रोड, बाळापूर, आदर्श कॉलनी, हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

१५ वर्षीय मुलगी व दोन वृद्धांचा मृत्यू

गुरुवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये पातूर येथील १५ वर्षीय मुलगी व अकोला शहरातील ८६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही अुक्रमे २३ व २४ फेब्रुवारी रोजी उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी अकोट येथील ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते,

६० जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, ओझोन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १४ अशाा एकूण ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

२,९२१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५,१२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,८४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,९२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला