अकोला : शिक्षकांचे वेतन ऑनलाईन अदा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे सांगून मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, बँकांकडून घेतलेले कर्जाचे हप्ते भरण्यासही त्रासदायक ठरत आहे.प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वेतन मार्च महिन्यापासून ऑनलाईन अदा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांचे वेतन शिक्षकांना अदा करण्यात आले नाहीत. काही शाळांवरील शिक्षकांना मागील तीन महिन्यांपासूनच वेतन देण्यात आले नसल्याची माहिती आहे. दोन ते तीन महिन्यांपासून वेतन अदा होत नसल्याने शिक्षक संतप्त झाले असून, वेतन अदा करण्याची प्रक्रिया ऑफलाईन करण्यात यावी, अशाी मागणी शिक्षकांनी केली आहे. ऑनलाईन प्रक्रिया योग्यरीत्या सुरूझाल्यानंतर या पद्धतीने वेतन अदा करण्यास हरकत नसून, मागील दोन महिन्यांचे वेतन सध्यातरी मागील पद्धतीनुसारच अदा करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
By admin | Updated: May 14, 2014 19:22 IST