शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

धान्य साठय़ाला गोदाम क्षमतेचा अडसर

By admin | Updated: October 23, 2016 02:06 IST

हजारो क्विंटलचे वाटप झाले असून धान्य साठवायला जागाच उपलब्ध नाही!

अकोला, दि. २२- सार्वजनिक वितरण प्रणालीतून लाभार्थींना नियमित धान्य वाटपासाठी लागणारी साठवणुकीची क्षमता जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांच्या गोदामात नाही. त्यातच दरमहा धान्य वाटपाचे वेळापत्रकही पाळले जात नसल्याने ही समस्या गंभीर होत आहे. आता जिल्ह्यात आणखी ४८ हजारांपेक्षाही अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना धान्य वाटपासाठी पात्र केले जाणार आहे. त्यांच्या धान्य साठय़ाचीही मोठी अडचण निर्माण होणार आहे. राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. त्यावेळी लाभार्थींची संख्याही निश्‍चित झाली होती. त्यामध्ये ग्रामीण भागा तील एकूण शिधापत्रिकांच्या ७६ टक्के, तर शहरी भागात ४५ टक्के लाभार्थींना अन्नधान्यासाठी पात्र ठरविण्यात आले. उर्वरित लाभार्थी एका झटक्यातच वंचित झाले.अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे फेब्रुवारी २0१४ पासून वंचित असलेल्या शिधापत्रिकाधारकांपैकी निवड करून त्यांना धान्य दिले जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ४१,३२५, तर शहरी भागातून ७२0९ लाभार्थींना पात्र ठरविले जाणार आहे. ही निवड प्रक्रिया पुरवठा विभागाकडून लवकरच सुरू केली जाणार आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा वाटप करण्याइतके धान्य साठवणूक क्षमताच नाही. त्यामुळे महिन्याच्या काही दिवसांपर्यंत धान्य आणणे त्यानंतर वाटप करणे, हाच कार्यक्रम सुरू आहे. आता आणखी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू झाल्यानंतर दहा ते बारा हजार मे.टन धान्य दरमहा द्यावे लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी दीड ते दोन हजार मे.टन धान्य अतिरिक्त वाटप होणार आहे. ते धान्य कोठे साठवावे, ही समस्या पुरवठा विभागाकडे नव्याने निर्माण होणार आहे. एकाचवेळी साठा आणि वाटपाची घाईजिल्ह्यात सद्यस्थितीत चालू महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी त्याच महिन्यात उचल केली जाते. प्रत्यक्षात गोदामा त कोणत्याही वेळी दोन महिने वाटपाचा साठा उपलब्ध असावयास हवा. मात्र, जिल्ह्यात कोठेच ती परिस्थिती नाही. पातूर तालुक्यात दरमहा ८ ते ९ हजार मे.टन धान्य वाटप होते. तेथे केवळ तीन हजार मे.टन क्षमतेचे गोदाम आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात सात ते आठ हजार मे.टन धान्य वाटपासाठी चार ते पाच हजार मे.टन क्षमतेचे गोदाम आहेत. बाळापुरात आठ हजार मे.टन नियतनासाठी ५ हजार मे.टन क्षमतेचा गोदाम आहे. अकोट आणि तेल्हारा तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. मूर्तिजापूर तालुक्यासाठी गोदामाची क्षमता समाधानकारक आहे.