चोहोट्टा बाजार : रानडुकरांची शिकार करण्यासाठी पाटसूल शेतशिवारात ठेवलेले थिमेटमि२िँं१्रूँं१त कणकेचे गोळे खाल्ल्याने ६ गुरे दगावल्याची घटना सोमवार, ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी चोहोट्टा बाजार पोलिस चौकीत थिमेटचे गोळे टाकणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आकोट तालुक्यातील पाटसूल शेतशिवारात रविवारी रात्री सहा गुरे दगावल्याची माहिती आकोट पोलिस चौकीच्या कर्मचार्यांना सोमवारी मिळाली. यावेळी अशोकसिंह ठाकूर, पांडुरंग राऊत, संजय घायल या पोलिस कर्मचार्यांनी गावकर्यांसह घटनास्थळ गाठले. यामध्ये पाटसूल येथील जगदेवराव सपकाळ यांची एक गाय, एक गोर्हा, बैजू बरडे यांच्या दोन गायी, नागोराव अढाऊ यांची एक गाय, राजू नृपनारायण यांच्या एक गायीचा समावेश आहे.
थिमेटचे गोळे खाल्ल्याने ६ गुरे दगावली
By admin | Updated: August 5, 2014 00:52 IST