लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील दहीगाव अवताडे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने १४ जून रोजी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली.तालुक्यातील दहीगाव अवताडे येथे दारू बनवत असल्याच्या गुप्त माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने बुधवारी धाड टाकली असता आरोपी करीम शेख शब्बीर (३२) रा. दहीगाव अवताडे याच्या घरून २५ लीटर गावठी दारू व २६ मोहाचे टिप असा एकूण १० हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करून आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध कलम ६५ (ई) क, ड, फ नुसार कारवाई करून अटक करण्यात आली. ही कारवाई पथकातील पीएसआय डॉ. बी. आर. सवंडकर, पो.काँ. सुभाष बिल्लेवार, हर्षद देशमुख, बालाजी सवडकर, महेंद्र बहादुरकर व तेल्हारा पो.स्टे.चे एएसआय जानराव सोळंके व विनोद बदरखे यांनी केली.