आगर : मशागतीची कामे आटोपली असून, शेतकरी आता पेरणीसाठी सज्ज झाला आहे. शेतकरी बीटी कॉटन, सोयाबीन, उडीद, डीएपी खत, मूग, ज्वारी, तूर व युरिया खरेदीसाठी गर्दी करीत आहे. प्रत्येक पीक घेण्यासाठी विविध प्रकारची खते व औषधींची शेतकर्यांना गरज भासत असते. पावसाळा जवळ आला की खतांची खरेदी सुरू होते; परंतु पावसाळ्यापूर्वी खतांची मागणी जास्त असल्यामुळे भाववाढ होते, त्यामुळे शेतकर्यांना वाढीव दराचा त्रास सोसावा लागत आहे. पाऊस ७ जूनपासून सुरू होतो; परंतु ९ जूनपर्यंत पाऊस पडलेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीसाठी सज्ज असलेले शेतकरी यंदा पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. हातउसणे करू न शेतकर्यांनी महागडी बियाणे खरेदी केली. तर काहींनी उधारीत खरेदी केली. गतवर्षी पावसाने नासधूस केल्यामुळे अपेक्षेप्रमाणे पीक घरात आले नाही. यामुळे शेतकरी आता निसर्गावर पुन्हा विश्वास ठेवून कामाला लागला आहे.
बियाणे, खत खरेदीसाठी झुंबड
By admin | Updated: June 12, 2014 21:39 IST