लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रिन आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ व ‘सुंदर माझं घर’ कार्यक्रमांना सखींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी तसेच जलसंवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी एक यशस्वी पाऊल टाकण्यात आले. या प्रसंगी रिनतर्फे निखिल तिवारी, इंटेरिअर डिझायनर नवीन धोटकर, नीलाक्षी नरवाडे, डॉ. पल्लवी ढवळे यांची विशेष उपस्थिती होती.अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर एक स्लाइड शो सादरीकरणाद्वारे उपस्थितांना रिन आणि ‘लोकमत’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी बोलताना निखिल तिवारी म्हणाले की, रिन एक ब्रॅण्ड असून, महाराष्ट्र जलसमृद्ध करण्यासाठी ‘लोकमत’च्या सहकार्याने पाणी बचतीविषयी जनजागृती करीत आहे. या साबणाचा फेस अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, ज्यामुळे अतिशय कमी पाण्यात कपडे स्वच्छ धुणे सहज शक्य झाले आहे. रिनच्या वापरामुळे कपडे धुण्याच्या पाण्याची ४० टक्क्यापेक्षाही जास्त बचत होते, असे निखिल तिवारी यांनी स्पष्ट केले.इंटेरिअर डिझायनर नवीन धोटकर यांनी, ‘सुंदर माझं घर’ या कार्यक्रमात सखींना मार्गदर्शन केले. कमीत कमी बदल करून घर अधिक आकर्षक कसे करता येईल, याविषयी त्यांनी माहिती दिली. घरातल्या ज्या स्थायी वस्तू असतात, त्यांचे रंग निवडताना जास्त जोखीम घेऊ नये. पडदे, फ्लोरिंग, बेडशीट यांच्यासाठी वेगवेगळे रंग वापरण्यास हरकत नसल्याचे ते म्हणाले. डायनिंग आणि दिवानखाना यांची रंगसंगती एकमेकांशी पूरक असावी. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्याचा सत्कार करून समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन अमोल शेंडे यांनी केले.विविध स्पर्धांची धमालकार्यक्रमादरम्यान पाणी बचतीविषयी पोस्टर बनविणे व संदेश लिहिणे स्पर्धा घेण्यात आली होती. पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये प्रथम प्रमिला पुरी, द्वितीय जयश्री साखरकर आणि लेखन स्पर्धेमध्ये प्रथम जया शिरसाट, द्वितीय सविता इंगळे, तृतीय सीमा निकम यांना बक्षीस मिळाले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या ‘वन मिनिट शो’ स्पर्धेमध्येही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सखींनी धमाल केली.
‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ला मिळाला सखींचा प्रतिसाद
By admin | Updated: June 17, 2017 01:12 IST