प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत सतत सात तास ही सायकल यात्रा राहणार आहे. या यात्रेचा प्रारंभ सकाळी स्थानीय सिव्हील लाईन परिसरातील आयएमएच्या प्रांगणात आयएमएचे अध्यक्ष डॉ.कमलकिशोर लढ्ढा, सचिव डॉ.अमोल केळकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होऊन सामूहिक सायकलची प्रभात फेरी प्रारंभ होणार आहे. महानगरातील विविध रस्त्यावरून सोळा किमी.चे अंतर पार करून हा जत्था म्हैसांगकडे रवाना होणार आहे. यात अकोला सायक्लॉन समूहाचे डॉ.राजेंद्र सोनोने, ॲड. देवेन अग्रवाल, डॉ.प्रशांत मुळावकर, डॉ.पराग टापरे, डॉ.के. के. अग्रवाल, डॉ.प्रशांत अग्रवाल, डॉ.किशोर पाचकोर, डॉ.महेंद्र चांडक, डॉ.जुगल चिरानिया, डॉ.विनायक देशमुख, डॉ.प्रमोद चिरानिया, डॉ.संतोष सोमाणी, डॉ.महेश गांधी, संजय पंजवानी, आनंद मनवाणी, मनीष सेठी, डॉ.अर्चना टापरे आदी सायकलपटू सहभागी होणार आहेत. या अटेम्प्टची चित्रफित परीक्षकांच्या उपस्थितीत जागतिक विक्रमासाठी पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर राखत या उपक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन अकोला सायक्लॉन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रजासत्ताकदिनी वर्ल्ड रेकाॅर्डसाठी सामूहिक सायकलचा प्रयोग रंगणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST