शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस अत्यल्पच !

By admin | Updated: August 2, 2014 23:12 IST

वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसून येते.

वाशिम : जिल्हयात मृग नक्षत्रास सुरूवात झाल्यापासून दमदार पाऊसच न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा, जनावरांसाठी चार्‍यांसह विविध अडचणीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडल्याचे पर्जन्यमान अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येते. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर संपूर्ण महिन्यात एक दोन दा केवळ रिमझिम पावसाव्यतिरिक्त दमदार पाऊसचं झाला नाही. जुलै महिन्यात काही भागात पेरणीलायक पाऊस झाल्याने काही शेतकर्‍यांनी पेरणी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने दांडी मारल्याने शेतकर्‍यांनी केलेल्या पेरणी तर वायाच गेली शिवाय ङ्म्रम व पैशाचे सुध्दा नुकसान झाले. काही भागात दुबार तर काही भागात तिबार पेरणी लहरी पावसामुळे शेरतकर्‍यांना करण्याची वेळ आली. वाशिम जिल्हयाचा संपूर्ण जुलै महिन्याच्या तालुकानिहाय पर्जन्यमानाच्या अहवालाचा अभ्यास केल्यास वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही फार कमी पाऊस पडल्याचे दिसते. गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण ३९८४ मि.मि. पावसाची नोंद असून सरासरी ६६४.00 आहे तर यावर्षी ३१ जुलैपर्यंत १४७८.८0 तर सरासरी २४६.४७ पाऊस झाला आहे. गतवर्षी माहे जुलैपर्यत तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये वाशिम ६७७, मालेगाव ६२१, रिसोड ६१५, मंगरूळपीर ८३५, मानोरा ६८२ तर कारंजा ५५४ असा एकूण ३९८४ मि.मि. पाऊस पडला. तर यावर्षी जुलैपर्यंत वाशिम २३७.८0, मालेगाव २५६.८0, रिसोड १८५.00, मंगरूळपीर २५४.३0, मानोरा २३३.९0 तर कारंजा ३११ मि.मि. पाऊस पडला. यावर्षी पडलेल्या पावसाची टक्केवारी एकूण ५८.४0 असली तरी वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी ३0.८६ आहे. तालुकानिहाय वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता वाशिम, मालेगाव, रिसोड, मगरूळपीर, मानोरा, कारंजात अनुक्रमे २६.0९, ३0.५८, २४.६४, ३२.६५, ३0.७६, ४१.४२ मि.मि. पाऊस पडला आहे. पर्जन्यमान अहवालानुसार जुलैपर्यंत २५३२.२0 सरासरी अपेक्षित पाऊस होता मात्र प्रत्यक्षात १४७८.८0 चं पाऊस पडल्याने अनेक समस्या उभे राहण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.** जिल्हयात गुरांच्या चार्‍याचा प्रश्न कायमजिल्हयात पावसाची परिस्थीती पाहता भयावह परिस्थिती असून आतापासूनच गुरांच्या चार्‍याचा प्रश्न कायम झालेला आहे. अनेक संघटना, लोकप्रतिनिधींनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून जिल्हयात चारा डेपो उघडण्याची मागणी सुध्दा केली आहे. काही शेतकर्‍यांनी तर चक्क जनावरांना ढेप देण्यास सुरूवात केली आहे. समाधानकारक पाऊस न आल्यास शेतकर्‍यांवर जनावरे विकण्याची वेळ येवू शकते.** मंगरूळपीर तालुक्यात आठ दिवसात चारा डेपोमंगरूळपीर: तालुक्यात अत्यल्प प्रमाण झालेल्या पावसामुळे गुरांच्या चार्‍यांचा भिषण प्रश्न्न निर्माण झाली असुन चार डेपो चालु करण्या संदर्भा झालेल्या चर्चेत येत्या आठ दिवसात चारा डेपो सुरू करण्याचे आश्‍वासन उपविभागीय अधिकारी दिनकर काळे यांनी दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वसंतराव पाटील शेगीकर यांनी दिली** पाण्याच्या पातळीत घटवाशिम शहरातील घरगुती बोअरवेलला अद्याप पाणी आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस न आल्याने पाण्याच्यापातळीत वाढ झालेली दिसून येत नाही. तसेच जिल्हयातील प्रकल्पातही पाण्याची पातळी वाढलेली दिसून येत नाही.** २ ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात पडलेला पाऊसवाशिम, रिसोड, मंगरूळपीर व मालेगाव काहीच नाही. मानोरा 0५.00 मि.मि.; कारंजा 0९.00 मि.मि.; जिल्हयात एकूण १४.00 मि.मि.