लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा निकाल ३० मे रोजी घोषित करण्यात आला. यामध्ये अकोट तालुक्याचा निकाल ९२.०७ टक्के लागला आहे. यामध्ये लालबहादूर शास्त्री ज्ञानपीठ अकोट, लक्ष्मीबाई गणगणे ज्युनिअर कॉलेज वडाळी देशमुख व दिवालीबेन सेदाणी ज्युनिअर कॉलेज अकोट या तीन शाळांचा निकाल १०० टक्केलागला आहे.आज जाहीर केलेल्या निकालामध्ये शिवाजी ज्युनिअर कॉलेज ९७.३३, उर्दू ज्युनिअर कॉलेज ८७.८३, श्री शिवाजी कॉलेज ९५.००, सार्वजनिक आटर््स-कॉमर्स ज्यु.कॉलेज चोहोट्टा ८२.५५, राधाबाई गणगणे ज्यु. कॉलेज मुंडगाव ८९.६, भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालय ९९.२३, नरसिंग कन्या ज्यु. कॉलेज ९७.१८, लक्ष्मीबाई गणगणे ज्यु. कॉलेज ९८.४५, नेहरू ज्यु. कॉलेज अकोलखेड ९७.७२, गजानन ज्यु. कॉलेज अकोली जहागीर ९१.२२, जिल्हा परिषद ज्यु. कॉलेज अकोट ८१.८१, शिवाजी आर्ट्स-कॉमर्स कॉलेज कुटासा ९१.३३, नरसिंग उच्च माध्यमिक विद्यालय अकोट ९७.०५, पंडित नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय वरूर जऊळका ९४.४४, संत तुकाराम महाराज ज्यु. कॉलेज किनखेड ९५.३७, एस.एम. विद्यालय अकोट ८२.६९, नंदिकेश्वर आर्ट ज्यु. कॉलेज पुंडा ७१.१५, हुसेन दलवाई उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय पणज ७७.७७, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय ९८.९५, लालबहादूर शास्त्री ज्ञानपीठ १००, ईकरा उर्दू सायन्स ज्यु. कॉलेज ८८.००, म. सईद पटेल उर्दू आटर््स ज्यु. कॉलेज ८३.०१, स्व. जगजीवनराम ज्यु. कॉलेज ९२.३०, यशोदा उच्च माध्यमिक विद्यालय ९३.४४, श्रीराम ज्यु. कॉलेज रुईखेड ८६.०४, सेंट पॉल्स ज्यु. कॉलेज अकोट ९५.८३, श्री शिवाजी ज्यु. कॉलेज ७५.००, भाऊसाहेब पोटे सेकंडरी अॅण्ड हायर सेकंडरी विद्यालय ८१.५७, लक्ष्मीबाई गणगणे ज्यु.कॉलेज ८५.७१, नरसिंग ज्यु.कॉलेज अकोट ६२.९० अशी टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्तेचा टक्का वाढला विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत तालुक्याच्या गुणवत्तेच्या टक्केवारीत वाढ झाली असून, गतवर्षी बारावीचा निकाल ८६.९५ टक्के टक्के एवढा होता, तर यावर्षी ९१.०७ टक्के इतका आहे. अकोट तालुक्यातून बारावीची परीक्षा ३,५९४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ३,३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये १ हजार ८८७ पैकी १,६८३ मुले तर १,७०७ पैकी १,६२६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
अकोट तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.०७ टक्के
By admin | Updated: May 31, 2017 01:13 IST