अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने सन २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात एकूण ५४ खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांचे आयोजन व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दालनात सभा पार पडली.सभेत ५४ खेळांच्या स्पर्धांचे आयोजन व नियोजनाबाबत चर्चा झाली. यामध्ये १४,१७,१९ वर्षाआतील मुले व मुलींचे गट राहतील. स्पर्धा जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात होतील. स्पर्धांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून, क्रीडा माहिती पुस्तिका सभेत वितरित करण्यात आली. सभेला जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्यालय, महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सभेमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष अशोक मंडले, राजेश जळमकर, साहेबराव वानखडे, बुढन गाडेकर, राजेश बेले यांची मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांनी केले. आभार रवींद्र धारपवार यांनी केले.
वर्षभरात ५४ स्पर्धांचे आयोजन
By admin | Updated: July 29, 2014 20:32 IST