लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नव्या धोरणानुसार राबवल्या जाणार्या बदली प्रक्रियेमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे त्या निर्णयानुसार अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या करू नये, असा ठराव शिक्षण समितीने शुक्रवारी घेतला. बदली प्रक्रियेबाबत जिल्हा परिषदेची भूमिका शासनाला कळविली जाणार आहे. निर्णयात बदल सुचवून लागू करावा, असा प्रस्ताव पाठवण्याचे समितीने ठरविले. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने सातत्याने लावून धरले, हे विशेष. जिल्हय़ांतर्गत बदल्यांसंदर्भात १५ मे २0१४ रोजीच्या आदेशातून शिक्षकांना वगळण्यात आले. त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारी २0१७ रोजीच्या निर्णयानुसार नव्याने धोरण निश्चित केले. त्या धोरणामुळे अकोला जिल्हय़ातील शैक्षणिक गुणवत्तेचे नुकसान होईल, त्यामुळे प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेची शिक्षण समिती, अधिकार्यांना त्यातील समस्यांवर सर्वच शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांना माहिती दिली. बदली प्रक्रिया राबवण्यापूर्वी जिल्हय़ातील परिस्थितीबाबत शासनाला माहिती द्यावी, त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शनानेच बदली प्रक्रिया राबवावी, अशी सर्वच शिक्षक संघटनांची मागणी केली. ही मागणी आणि शासन निर्णयातील काही जाचक अटींबाबत लोकमतने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर शिक्षण समितीच्या बैठकीत शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया राबवण्यापूर्वी जिल्हय़ातील वस्तुस्थिती शासनाकडे पाठवावी, त्यावर शासनाचे मार्गदर्शन मागवावे, त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवावी, असा ठराव सदस्या अनिता आखरे, ज्योत्स्ना चोरे यांनी मांडला. सभापती पुंडलिकराव अरबट यांनीही त्यावर कार्यवाही करण्याचे सांगितले. त्यामुळे आता जिल्हा परिषद शिक्षण समितीचा ठराव आणि अवघड, सोप्या क्षेत्राची वस्तुस्थितीदर्शक माहिती शासनाकडे पाठवली जाणार आहे. त्यातून पुढे येणार्या मुद्दय़ांवर मार्गदर्शन मागवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे.
शिक्षकांच्या बदल्या न करण्याचा ठराव
By admin | Updated: May 28, 2017 03:51 IST