अकोला : भरधाव येणार्या मोटारसायकलने एसटी बसला जबर धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नवीन बसस्थानकावर घडली. जखमी युवकांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कट्यार येथे राहणारा गौरव पुंडलिक डाबेराव (२१) आणि त्याचा मित्र शिवणी येथील अक्षय विनोद देशमुख (२0) हे एमएच ३0 एएच ९५९८ क्रमांकाच्या मोटारसायकलने काही कामानिमित्त नवीन बसस्थानकावर आले. बसस्थानकावरून भरधाव वेगाने ते घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान बसस्थानकावर एक बस रस्त्याच्या कडेला उभी असल्याने समोरून येणारी आकोट आगाराची एमएच 0६ एस ७९३४ एसटी बस या दोघांच्याही दृष्टीस पडली नाही. त्यांची मोटारसायकल थेट बसवर जाऊन धडकली. यात गौरव व अक्षय दोघेही गंभीर झाले. दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले, डोक्याला मार लागला. जखमी युवकांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोटारसायकलची बसला धडक; दोन युवक गंभीर
By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST