शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ताळमेळ न घेताच लक्षावधींची कामे!

By admin | Updated: July 6, 2017 01:24 IST

१५ लाखांच्या मर्यादेची पडताळणीही नाही

अकोला : सक्षमीकरणाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांकडून ग्रामपंचायती सक्षम नसतानाही मर्यादेपेक्षा अधिक निधीची कामे दिल्या जातात. विशेष म्हणजे, कोणतीच पडताळणी न करताच ही कामे दिली जात असल्याने ग्रामपंचायतीसाठी कुरण मोकळे असल्याचा प्रकार घडत आहे.ग्रामीण भागात विविध कामे करण्यासाठी यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या एकूण निधीपैकी किमान १५ टक्के निधी उरतो. हा निधी ग्रामनिधीत जमाच होत नसल्याचा प्रकार जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये घडत आहे.ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने २५ मार्च २०१५ रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला ‘एजन्सी’चा दर्जा देण्यात आला. त्यानुसार वार्षिक उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना १० ते १५ लाख रुपयांपर्यंतची कामे देण्याचे ठरले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींनीच कायद्याने करणे बंधनकारक असलेली कामे (रोहयो- ५० टक्के), ग्रामपंचायतींनी करावयाची केंद्र शासनाच्या योजनेतील कामे, तसेच स्वनिधीतील कामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींना आर्थिक सक्षम करणे, हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार कोणत्याही कामाच्या किमतीतून किमान १५ टक्के रक्कम संबंधित एजन्सी, कंत्राटदाराला मिळते. ग्रामपंचायतीकडे एजन्सी म्हणून असलेल्या कामांतून उरणारा १५ टक्के निधी कोठे जातो, याची कुणालाही माहिती नाही. विशेष म्हणजे, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीला एका वर्षात ६० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चाची कामे दिली जात नाहीत. ग्रामपंचायतीकडे कुठलाच तांत्रिक कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने हे बंधन आहे; मात्र विविध यंत्रणांकडून ही अट न पाहताच विविध कामे ग्रामपंचायत स्तरावर दिली जात आहेत. काम देताना ग्रामपंचायतीकडे त्या वर्षात इतर यंत्रणेकडून कोणते काम दिले आहे का, याची माहितीही घेतली जात नाही. त्यामुळेच मर्यादेचे उल्लंघन करून ग्रामपंचायतींना ६० लाखापेक्षाही अधिक रकमेची कामे देण्याचे प्रकार घडत आहेत.विविध विभागाकडून दिली जातात कामेआतापर्यंत जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना वर्षभरात विविध यंत्रणांकडून कोट्यवधींची कामे देण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग, पाणीपुरवठा, लघुसिंचन, बांधकाम, समाजकल्याण आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींना कामे देताना या विभागांनी पडताळणी करणे आवश्यक आहे.