शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

पोलिस असल्याची बतावणी करून मुख्याध्यापिकेला लुटले

By admin | Updated: May 19, 2014 20:53 IST

पोलिस असल्याची बतावणी करून अकोला येथिल मुख्याध्यापिकेला १ लाख ३५ हजार रुपयांनी लुटले.

अकोला:   पोलिस असल्याची बतावणी दोघा जणांनी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयातील मुख्याध्यापिकेला करून १ लाख ३५ हजार रुपयांनी लुटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रामदासपेठमध्ये राहणार्‍या वैशाली विजय खेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या मुंगीलाल बाजोरिया विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी त्या पती विजय खेर यांचा जेवणाचा डबा पोहोचवून देण्यासाठी टिळक पार्कसमोरील जनरल स्टोअर्समध्ये जात असताना, त्यांना टिळक पार्कजवळ दोन इसमांनी अडविले आणि आम्ही पोलिस असून, समोरच्या चौकामध्ये चोरी झाली आहे. वातावरण खराब आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील सर्व दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असे सांगितले. त्यामुळे वैशाली खेर यांनी गळ्यातील १८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ ग्रॅमच्या सोन्याचे दोन बांगड्या, बोटातील ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी असे दागिने काढून दिले. या तोतया पोलिसांनी त्यांच्याजवळील दागिने त्यांना एका कागदामध्ये बांधून दिले आणि जाण्यास सांगितले. वैशाली खेर या पतीच्या जनरल स्टोअर्सच्या दुकानामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पर्समधील कागद काढला आणि उघडून पाहिला असता त्यामध्ये नकली बांगड्या असल्याचे त्यांना दिसल्यावर आपली फसवणून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रामदासपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला. या दोन चोरट्यांजवळ काळ्या रंगाची मोटारसायकल होती, असे सांगून त्यांनी दोघाही चोरट्यांचे वर्णन पोलिसांना सांगितले.