शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

सिंचनाने झाली बागायती : वनस्पती कुंपणाची केली तटबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

अकोट : खारपाणपट्ट्यातील शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असते, पंरतु अकोट तालुक्यातील खापरवाडी बु. येथील जगन प्रल्हादराव बगाडे या शेतकऱ्याने ...

अकोट : खारपाणपट्ट्यातील शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असते, पंरतु अकोट तालुक्यातील खापरवाडी बु. येथील जगन प्रल्हादराव बगाडे या शेतकऱ्याने खारपाणपट्ट्यात संरक्षित सिंचनाची सोय करून बारामाही बागायती शेती फुलविली आहे. वन्यप्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेती सभोवताली विनाखर्चाची सजीव वनस्पतीची तटबंदी केली. विविध प्रयोगांच्या माध्यमातून ते यशस्वी बागायती पिके घेत असून, त्यांच्या शेती प्रयोगाची दखल शासन निर्णयातही घेतली आहे.

खारपाणपट्टात पीक पद्धतीत बदल करून हरितक्रांती घडविणाऱ्या या शेतकऱ्याने पाणलोट, जलसंवर्धनाचे कार्य केले. पडित जमिनीवर गावकऱ्यांच्या सहकार्याने तीन वर्षांमध्ये ३२ शेततळे निर्माण केले. त्यामुळे या परिसरातील २५ बोअरवेल पाणीदार केल्या. पाण्याची पातळी वाढल्याने गोडे पाण्याचा पट्टा वाढविला. मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने बगाडे यांनी खारपाणपट्ट्यामधील १५ एकरांतील कोरडवाहू शेतातील खारट शेती क्षेत्रातील पिकांना नवसंजीवनी दिली. शेतात फळबाग व पालेभाजीसोबतच कापूस, तूर, हरभरा पिके तर घेत आहेत. निंबूची बागही त्यांनी फुलविली. सोबतच शेतात आवळा, साग, करवंद, गुळवेल आदी वनस्पतींची लागवड केली आहे. कंपोस्ट खत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, गार्बेन इन्जाइम, फेरोमेन ट्रॅप आदी विविध प्रकारचे जैविक कल्चरचा वापर ते स्वत: शेतीमध्ये करित आहेत. तसेच इतरांना सुद्धा अशा प्रकार विषमुक्त शेती करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. सोबतच कंटूर बंडिंग, कम्पार्टमेंट बंडिंग, उताराला आडवी पेरणी याबाबत मार्गदर्शन करतात. सर्व पिकांसाठी जैविक कीटकनाशक निंबोळी अर्क, गारबेन इन्माइम, कंपोस्ट खत, दशपर्णी अर्क घरीच बनवून त्याचा वापर शेतीत करतात. विशेषतः भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार म्हणून शेतीला जोडधंद्यांची साथ देत शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, दालमिल, पीठ गिरणी सुरू केली. पशुंसाठी खाद्याची पेरणी केली.

शेतकरी पाणलोट सचिव म्हणून जगन बगाडे यांच्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या परिश्रमातून पाणी फाउंडेशनमध्ये गावाने सहभाग घेऊन १९ शेततळे, नाला खोलीकरण केले. शेतीपिकासाठी पी.के.व्ही. येथील संशोधक, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले. कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. जगन बगाडे यांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी विभागामार्फत संसाधन शेतकऱ्यांच्या प्रकल्पाचे विस्तार कार्यामध्ये व प्रशिक्षणमध्ये सहभाग करण्यात आला आहे.

................

चौकट...

तटबंदीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त

खारपाणपट्ट्यात शेती पिकांचे वन्यप्राणी मोठे नुकसान करतात, पंरतु लोखंडी कुंपणे करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता. त्यामुळे बगाडे यांनी शेतीला जैविक कुंपण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी कॅक्ट्स म्हणजेच निवडूंग प्रकारातील वनस्पतीचे जवळपास १५ एकर शेतीला कुंपण केले. शेतातील कुंपण १२ फुट उंच व ३ फुट रुंद आहे. या कुंपणाने वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होत आहे. कुंपनासाठी लागणारे कॅक्ट्स जगन बगाडे इतर शेतकऱ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देत आहेत.