लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील गोरक्षण रोडवर देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पेट्या दारू आणि दोन दुचाकी असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महादेव लक्ष्मण यादव आणि नीलेश सुरेश तेलगोटे हे दोघे जण दुचाकीवर देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून या दोघांकडून दारूच्या तीन पेट्या जप्त केल्या. सोबतच दोन वाहनेही जप्त करण्यात आली असून, एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात शेर अली, नरेंद्र चऱ्हाटे, राकेश वानखडे, अमित दुबे, संदीप काटकर यांनी केली.
देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक; दोेघे ताब्यात
By admin | Updated: May 29, 2017 00:57 IST