लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: स्थानिक स्टेशन विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे थकीत वीज देयकासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना १६ जून रोजी दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूर्तिजापूर शहर विभागामध्ये वीज वितरणचे तंत्रज्ञ नागेश्वर कुलमेथे सहकाऱ्यांबरोबर शे. अब्बास शे. मोहम्मद याच्याकडे देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेले होते. कुलमेथे थकीत देयकाचे पैसे मागण्यासाठी गेले असता शे. रिजवान शे. खलील याने कुलमेथे यांना काठीने मारहाण केली. तसेच तेथे उपस्थित असलेले शे. गुड्डु शे. खालील व शे. वसीम शे. बशीर यांनीही कुलमेथे यांना मारहाण केली. हा प्रकार कुलमेथे यांच्या सहकाऱ्यांना दिसताच त्यांनी त्यांची तिघांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी कुलमेथे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध मूर्तिजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण
By admin | Updated: June 17, 2017 01:29 IST