शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शेतात अंत्यविधीच्या वादावरून गोरेगावात तणाव

By admin | Updated: December 31, 2014 00:52 IST

पोलीस बंदोबस्तात पार पडला अंत्यविधी.

गोरेगाव खुर्द (अकोला): येथील एका शेतात मृतकाचा अंत्यविधी करण्यावरून मंगळवारी गोरेगावात तणाव निर्माण झाला. शेतमालकाने सदर जागेत अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. अखेर तहसीलदार व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून गावकर्‍यांची व शेतमालकाची समजूत काढून हा वाद तात्पुरता निकाली काढला.अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील जी. टी. वाकोडे यांच्या गावालगतच्या शेतातील एका कोपर्‍यात गत काही वर्षांपासून गावातील एका समाजातील मृतकांचा अंत्यविधी केला जातो. याला वाकोडे यांनी आजपर्यंत हरकत घेतली नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेताला तारेचे कुंपण घेतले. दरम्यान, मंगळवारी गावातील शेवंताबाई तायडे यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह स्मशानभूमीत आणला; परंतु तेथे तारेचे कुंपण असल्यामुळे त्यांनी मृतदेह तेथेच ठेवला. गत अनेक वर्षांपासून या जागेवर अंत्यविधी केला जात असल्यामुळे आजही तेथेच अंत्यविधी करू द्यावा, अशी भूमिका मृतकाचे कुटुंबीय व इतरांनी घेतली; परंतु या जागेवर स्मशानभूमी असल्याची कोणतीही नोंद नसल्याचे सांगत वाकोडे यांनी तसे करू देण्यास हरकत घेतली. शेवटी हा वाद विकोपास गेल्यानंतर माजी उपसरपंच सारंग तायडे यांनी ही बाब बाळापूर पोलिसांना कळविली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे ठाणेदार घनश्याम पाटील पोलीस ताफ्यासह गावात दाखल झाले. हा सर्व प्रकार दुपारी १२ ते सायंकाळी ४.३0 पर्यंत सुरू होता. अखेर अकोल्याचे तहसीलदार संतोष शिंदे, ठाणेदार पाटील, जे. टी. वाकोडे, सुनील तायडे, संजय तायडे, सारंग तायडे, पोलीस पाटील दिलीप वाकोडे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संतोष वाकोडे आदींनी ग्रामपंचायत भवनात चर्चा करून हा वाद सामोपचाराने मिटविण्याचे ठरविले. यानंतर शेताचे एका भागाकडील तीन फुटांचे कुंपण काढण्यात आले आणि मृतदेह शेतात नेऊन तेथे अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान, गावातील शांतता भंग होऊ नये म्हणून ठाणेदार पाटील यांनी कमांडो दलाचे ३0 जवान व बाळापूरचे पोलीस कर्मचारी बोलावले होते. यावेळी तहसीलदारांनी स्मशानभूमीच्या वादावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.