सध्या उन्हाळी सुट्टय़ा आणि लग्नसराईचा मोसम असल्याने बाहेरगावी जाणार्यांची संख्या मोठी आहे. बंद घर पाहून घरफोडी आणि चोरी करण्यासाठी गुन्हेगारांनी उपद्रव सुरु केला आहे. गत महिनाभरात शहर व जिल्ह्यात घरफोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.
** नोकराबाबत काळजी घ्या नोकराचे संपूर्ण नाव, गाव, वय, राहण्याचा पत्ता व संपर्क क्रमांक घेऊ न ठेवा. नोकराचे मूळ राहण्याचे ठिकाण तसेच कुटुंबीयांची माहिती घ्या. नोकरास परिसरातील ओळखणार्या दोघांची नावे, पत्ता व दुरध्वनी क्रमांक घ्या. नोकराचा पासपोर्ट फोटो व शक्य झाल्यास त्याच्या बोटाचे ठसे घेऊन ठेवा. नोकरासमोर आपल्या संपत्तीचे प्रदर्शन टाळा. उदा - नोकर घरात नसल्यावर मौल्यवान वस्तू तसेच पैसे कपाटात ठेवा. कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या.
** खबरदारी घेतल्यास घरफोडी टळू शकते रात्री झोपताना घराचे दार, खिडक्या, कंपाऊंडचे गेट व्यवस्थित बंद असल्याची खात्री करा. शेजार्यांना आपल्याबाबत आवश्यक असणारी माहिती असू द्या. उदा. - फोन नंबर, कार्यालयाचा पत्ता, जवळच्या नातेवाईकाचा पत्ता. गावाला जाताना किंवा बाहेर जाताना घर नीट बंद करा तसेच आपण बाहेर जात असल्याची कल्पना शेजार्यांना द्या. जास्त काळ बाहेरगावी जायचे असल्यास आपल्या घरात जास्त पैसे, सोन्याचे दागिने ठेवू नका. गावाला जाण्याबाबत तसेच परत येण्याबाबतची माहिती परिसरातील पोलीस स्टेशनला द्या. बाहेर जाताना कपाटाच्या चाव्या सोबत घेऊ न जावे. तसेच मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्या.
** सुट्टय़ांमुळे चोरट्यांची ह्यचांदीह्ण सध्या शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टय़ा आहेत. त्यातच लग्नसराई जोरात असल्याने बाहेरगावी जाणार्यांचे प्रमाण वाढले आहे. कॉलनी आणि परिसरातील बंद घरांची पाहणी करुन चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी गुन्हेगारी उपद्रव केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढला आहे. त्यातच अनेक ठिकाणी भारनियमन सुरु असल्याने गच्चीवर झोपणार्यांची संख्या बर्यापैकी आहे. ही संधी साधत चोरटे घरफोडी करुन रक्क़म गायब करीत आहेत. घरफोडीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची गरज आहे.