शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे! कागदपत्र गाेळा करतानाच दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होत आहे. ...

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होत आहे. शपथपत्र, हमीपत्र, स्वयंघोषणापत्रासाठी साधा कागद की मुद्रांक वापरावा, यावरूनही उमेदवारांमध्ये संभ्रम असल्याने त्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आता सर्वत्र निर्माण झाले आहे.

निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी माहितीपत्रक लावण्यात आले. त्यामध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी आहे. त्या यादीत उल्लेख करताना शपथपत्र, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र असे उल्लेख आहेत. त्यापैकी कोणता पुरावा साध्या कागदावर द्यावा किंवा मुद्रांकावर हवा, याबाबत कुठेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे काही उमेदवार सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकावर ते सर्व सादर करीत आहेत, तर काही उमेदवार साध्या कागदावरच देत आहेत. त्यामुळे या दोन्ही पद्धतीत कोण चूक किंवा कोण बरोबर हे स्पष्ट होत नाही. त्यातच छाननीमध्ये कोणाचा अर्ज बाद ठरेल, हेही त्यामुळे स्पष्ट होऊ शकत नाही. त्यातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या बाबींची स्पष्टता होत नसल्याने गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

- नामनिर्देशन पत्रासोबत लागणारी कागदपत्रे

ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, दोनपेक्षा अधिक अपत्ये नसल्याचे प्रमाणपत्र, विवाहित महिलेला माहेरचे आणि सासरच्या नावाची एकच व्यक्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र, कोणताही गुन्हा दाखल किंवा शिक्षा झाली नसल्याचे शपथपत्र, जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत उपलब्ध करून देणार असल्याचे हमीपत्र, नावे असलेली संपत्ती, मालमत्तेचे घोषणापत्र या कागदपत्रांचा समावेश आहे. त्यातच राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना समितीपुढे सादर करण्यासाठी वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, दावा केलेल्या जातीचे पुरावे जोडत असल्याचे शपथपत्रही द्यावे लागते. शौचालय प्रमाणपत्र ग्रामपंचायतीच्या ठरावासह जोडायचे आहे. ही सर्व कागदपत्रे देताना नेमकी कोणत्या मुद्रांकावर व कोणत्या साध्या कागदावर याबाबत उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होत आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रच केवळ १०० रुपयांच्या मुद्रांकावर द्यावे लागते, असे सांगण्यात आले आहे.

- सातवी उत्तीर्णतेचीही अट

५ मार्च २०२० रोजीच्या अधिनियमानुसार जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीला निवडणूक लढण्यासाठी सातवी उत्तीर्णतेची अट आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्ती आता सातवी उत्तीर्ण नसेल तर तिला निवडणूक लढता येणार नाही. हे विशेष.

- सुटीच्या दिवशीही जातवैधता अर्ज स्वीकारणार

निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांचे ऑफलाइन अर्ज २५, २६, २७ या सुटीच्या दिवशीही स्वीकारले जातील, असे बुलडाणा जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी कळवले आहे.