शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शेतकऱ्यांची तक्रार येता कामा नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:44 IST

पालकमंत्र्यांचा निर्देश : अकोट येथे कृषी समाधान शिबिर; शेतकऱ्यांच्या ४० तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कदापिही हयगय केली जाणार नाही. प्रशासनाने नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. शेतकऱ्यांची कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सक्त सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या. अकोट येथील रावसाहेब शिवपूरकर सभागृहात आयोजित कृषी समाधान शिबिरात कृषीसंबंधी ४० शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून त्वरित निराकरण करण्याचे आदेश डॉ. रणजित पाटील यांनी दिले. तक्रारींमध्ये कृषी विभाग, बियाणे कंपनी, कृषी पीक विमा योजना, शेततळे, सिंचन विहीर, कृषी अवजारे, विद्युत जोडणी, सौरऊर्जा, विशेषत: अकोट-तेल्हारा तालुक्यामध्ये अत्यंत कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीसंदर्भात सर्व्हे करणाऱ्या तक्रारींचा समावेश होता. यावेळी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी गटशेतीकडे वळावे, ही योजना आणली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक राजेंद्र निकम, आत्मा प्रकल्प संचालक बाविस्कर, कृषी विकास अधिकारी अकोला ममदे, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी कंडारकर, तहसीलदार विश्वनाथ घुगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, पं.स.चे कृषी अधिकारी अनिल राठोड, गटविकास अधिकारी कालीदास तापी, महावितरणचे कार्यकारी अभियंता काकडे, डॉ. पंदेकृविचे शास्त्रज्ञ साखरे, माजी आमदार वसंतराव खोटरे, नारायणराव गव्हाणकर व डॉ. जगन्नाथ ढोणे, पं.स. उपसभापती सूर्यकांता घनबहादूर, माजी सभापती अंजनी तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाधान शिबिराकरिता अकोट व तेल्हारा तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांसह भाजप-सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. ‘शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा’बाळापूर: शासनाच्या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. बाळापूर तालुक्यात आयोजित कृषी समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या शिबिरात २३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, सरकार कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना रबावत आहे. शेतकरी स्वावलंबी व्हावा, कर्जमाफीबरोबरच त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळच येऊ नये यासाठी शासन विविध उपाययोजना आखत आहे. शेतीत जाणारे पांदन रस्ते खडीकरण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राममूर्ती, अग्रणी बँकेचे प्रबंधक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.एस. निकम, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पातूरचे तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी, बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे, पं.स. सभापती मंगला तितूर, आत्मा समितीचे अध्यक्ष गणेश तायडे, पातूरचे श्रीकांत बराटे, उपविभागीय कृषी अधिकारी कंडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुणकर यांनी तर संचालन बाळासाहेब वानखडे यांनी केले. यावेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जगन्नाथ ढोणे, वसंतराव खोटरे, शिवसंग्रामचे संदीप पाटील, पं.स.चे गटविकास अधिकारी वाय.डी. शिंदे, एन.एम. माने, आशीष शेलार, महावितरणचे उपअभियंता काळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मिलिंद जाधव आदी उपस्थित होते. आभार तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुणकर यांनी मानले. जनतेची कामे करा, अन्यथा कारवाई - जिल्हाधिकारी जनतेची कामे प्राधान्याने करा, सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या, जेणेकरून तक्रारी कमी होतील. अन्यथा जे अधिकारी, कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी दिला. एप्रिल २०१८ पर्यंत कृषी पंपांना वीज शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित शिबिरात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी एप्रिल २०१८ पर्यंत कृषी पंप जोडण्याची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच दोन वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतांची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येईल. कृषी उपयोगासाठी सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प स्थापन करण्यात येतील. बाळापूर तालुक्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून खडीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.