लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या हाणामारीत एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. खैर मोहम्मद प्लॉट येथे रविवारी सायंकाळी एका धार्मिक स्थळावरील आवाजामुळे किरकोळ वाद निर्माण झाला. या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये एकजण जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार डाबकी रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे. लहान मुलांच्या किरकोळ वादातून हे प्रकरण घडल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांनी दिली.
खैर मोहम्मद प्लॉटमध्ये हाणामारी
By admin | Updated: May 29, 2017 01:38 IST