कुठे कशी बेफिकीरी
बसस्थानक
बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली, मात्र अनेकांकडून मास्कचा उपयोग नाही.
एसटी बसमध्ये चढणाऱ्या एकाही प्रवाशाचे तापमान तपासले जात नाही.
फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन नाही.
एसटी महामंडळाकडूनही प्रवाशांना दिला जातो विनामास्क प्रवेश.
कापड बाजार
सध्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
येथेही फिजिलक डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.
दुकानात विनामास्कच प्रवेश दिला जातो.
शोरुम लहान असो वा मोठे, दोन्ही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश.
ऑटोमध्येही विनामास्कच प्रवेश
लॉकटाऊननंतर काही नियमांच्या अधीन राहून शहरातील रस्त्यांवर पुन्हा एकदा ऑटो धावू लागले. प्रारंभी नो मास्क नो एन्ट्री या नियमाचे पालन करण्यात आले. शिवाय, मर्यादित प्रवाशांनाच ऑटोत प्रवेश दिला जात होता. मात्र, आता एका ऑटोत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येतात. यातील क्वचितच प्रवाशांना मास्क दिसून येते. अनेक ऑटोचालकच विनामास्क ऑटो चालवत असल्याचे लोकमत रिॲलिटी चेकच्या माध्यमातून दिसून आले.
जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर होवून चालणार नाही. नो मास्क नो एन्ट्री हा नियम सर्वांनीच पाळावा. नागरिकांनीही प्रशासनाला साथ देवून कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी योगदान द्यावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला