शहरातील विविध भागात पाण्याची गळती
अकोला: शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी लिकेज असल्याने शहरातील विविध भागात पाण्याची गळती होताना दिसून येते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय याच माध्यमातून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होता. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जलवाहिनीची दुरस्ती करण्याची गरज आहे.
‘डेंग्यूपासून बचावासाठी पाण्याचे भांडे नियमित धुवा’
अकोला: वातावरणातील बदलामुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याने दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. अशातच शहरातील अनेक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूचीही भीती वाढली आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी नागरिकांनी पाण्याची भांडी नियमित स्वच्छ धुवावीत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
सर्वोपचार रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ
अकोला: कोरोना काळात सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे येथील काही वॉर्ड बंददेखील करण्यात आले होते. परंतु आता नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील वॉर्ड हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
रुग्ण नातेवाईकांकडून सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छता
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचीही गर्दी वाढली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वॉर्डाच्या परिसरात शिळे अन्न, तसेच इतर कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. याचा परिणाम रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावरही होत आहे.