शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याचे शेतक-यांपुढे आव्हान

By admin | Updated: December 8, 2014 01:14 IST

विदर्भातील शेतकरी व विदेशी कृषितज्ज्ञांचा सूर.

अकोला: विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर प्रश्न आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान केवळ शेतकर्‍यांपुरते र्मयादित नाही, तर समाज व शासनापुढेही ते आहे. कृषी पद्धती, बी-बियाण्यांच्या किमती, एकूण उत्पादन खर्च व बाजारात कृषी उत्पादनास मिळणारे भाव, यात जगभरात तफावत असून, यावर साक ल्याने विचार होणे गरजेचे असल्याचा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला परिसंवादाच्या शेवटच्या खुल्या चर्चासत्रात उमटला. भारताप्रमाणे प्रगत देशांतील शेतकरीदेखील संकटात आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे प्रग त राष्ट्रांसह आफ्रिका खंडातील देशांमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिसून येत असल्याचे विदेशी कृषितज्ज्ञांनी स्पष्ट केले. प्रगत देशांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी तेथील सरकार कुठलीही मदत करीत नाही. इंग्लंडमध्ये आत्महत्या करणे हा गुन्हा नसल्याचे इंग्लंड येथील महिला शेतकरी मोनिका हॉवर्ट यांनी स्पष्ट केले. आफ्रिका खंडातील देशांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यास स्वयंसेवी संस्था मदत करतात, असे केनियाच्या डोमिनका वान्झरू यांनी स्पष्ट केले. विदेशात कृषिमालाचे भाव सरकार नियंत्रित करीत नाही, तर विक्रे ते व अडतेच निश्‍चित करत असल्याचे ऑस्ट्रेलियाचे फिल जेफरीज् यांनी सांगितले. भारताप्रमाणेच कृषिमालाचे जास्त उत् पादन झाल्यास भाव कमी मिळतो व कमी उत्पादन असल्यास तुलनेने जास्त भाव मिळतात. काही विदेशी कंपन्यांनी पारंपरिक वाणांचे पेटेंट मिळविले असून, त्यामुळे बियाण्यांवर एकाधिकार मिळविला आहे. ऑस्ट्रेलियात तर बियाणे कंपनीकडूनच बियाणे घेणे शेतकर्‍यांसाठी बंधनकारक केले आहे. असे असतानादेखील पीकहानी झाल्यास त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नसल्याचे वास्तव फिल जेफेरीज् यांनी पुढे मांडले. भारताप्रमाणे इतर देशात कृषिमूल्य आयोग नाही. इतर कुठल्याही देशात बियाणे व खतांवर सवलत दिली जात नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. सेंद्रिय शेती भविष्याची गरज असली तरी केवळ तिच्यावर विसंबून जगाची अन्नाची गरज पूर्ण होऊ शक त नाही. त्यामुळे सेंद्रिय व रासायनिक शेतीमध्ये संतुलन साधण्याची गरज असल्याचे मत फ्रान्स येथील क्लाऊड बॉडींन यांनी व्यक्त केले. कृषी यांत्रिकीकरणाला र्मयादा असल्याचे जेफेरीज् यांनी अधोरेखित केले. कृषी मजुरांचा प्रश्नदेखील यावेळी उपस्थित केला होता. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. यावेळी आंतरराष्ट्रीय शेतकरी संवादचे सचिव जीम वेगन, ऑस्ट्रेलियातील फिल जेफरीज, उझबेकिस्तानच्या मुस्ताफिना फेरूझा, केनियाच्या डोमिनका वान्झरू व कॅनडाच्या शर्मिला गुंजल व्यासपीठावर उपस्थित हो त्या. चर्चासत्रात कुटासा येथील शिवाजीराव देशमुख, यवतमाळचे माणिक कदम, दर्यापूरचे अरविंद नळकांडे, मोर्शी येथील माणिकलाल मंत्री, राजकुमार भटकळ, सुनंदा सालोडकर, ललित बहाळेंसह इतर शेतकर्‍यांनी सहभाग घेऊन कृषिप्रश्नावर परदेशी शेतकर्‍यांचे व कृषितज्ज्ञांची मते जाणून घेतली.