अकोला - जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्ल्यू आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये. याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तालुकानिहाय समिती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
उपविभागीय अधिकारी यांनी समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, बर्ड फ्ल्यू संसर्गाचा प्रसार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण, बर्ड फ्ल्यू संसर्गाचा प्रसार कमी करण्याकरिता बाधित व सर्वेक्षण क्षेत्रामध्ये अधिसूचनेची अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे याबाबत कार्यवाही करावी. पशुधन विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांनी दैनदिन अहवाल सकंलित करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे, प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशव्दारे आणि परिसर दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किवा पोटॉशियम परमॅगनेटने निर्जंतुकीरण करुन घ्यावे, समितीच्या कामकाजाचे दस्त व लेखे अहवाल ठेवणे, मोहीम सुरु होण्यापूर्वी जलद कृती दलातील सर्व सदस्यांचे आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार पीपीई किटचा पुरवठा करणे, मृत पक्ष्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबी सक्शन मशीन, फगर मशीन, स्प्रे मशीन व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणे.
तहसीलदार यांनी समितीच्या कामकाजावर समन्वय साधने आवश्यक साहित्यांचा(प्लास्टिक ब्लिचींग पावडर, चुना पावडर इतादी पुरवठा करणे) मृत कुक्कूट पक्ष्यांचे तलाठी, ग्रामसेवक आणि पशुधन विकास अधिकारी यांचे मार्फत स्थळ पंचनामा करुन घेणे. पोलीस निरीक्षक यांनी प्रभावित पोल्ट्री फार्मच्या एक कि.मी. त्रिज्येतील परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, मृत पक्ष्यांचे विल्हेवाट लावतांना गर्दी होवू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे. तर पशुधन विकास अधिकारी(विस्तार) यांनी कार्यक्षेत्रात जनजागृती करणे, यासाठी आवश्यक ते आयईसीची निर्मिती करणे, या आजारासंदर्भात नागरिकांपर्यत माहिती पोहचविणे, प्रभावित क्षेत्राच्या १० कि.मी.परिसरातील बाजारावर देखरेख ठेवणे. उपअभियंता पाठबंधारे जलसंपदा रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांनी स्थंलातरित पक्षी, वन्य पक्षी, कावळे इत्यादी बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधून योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम पार पाडावे, असे आदेश देण्यात आले आहेत