बुलडाणा : शेगाव- खामगाव हा १७ किमीचा मार्ग आज पहाटे साडेपाच वाजल्यापासुनच गजबजलेला होता..टाळ मृदंगाचा गजर, पहाटेच्या थंड हवेत डौलाने फडकत असलेल्या भगव्या पताका व ङ्म्री संत गजानन महाराजांच्या नामघोषाचा आसमंतात गुंजणारा स्वर अशा मनोहरी वातावरण संपूर्ण १७ किमी लांबीचा भक्तीसागर विदर्भ पंढरी शेगावकडे पावलापावलाने सरकत होता असे विलोभनिय चित्र आज या मार्गावर होते.पंढरीची वारी एकदा तरी व्हावी अशी अनेकांची इच्छा असते मात्र सर्वांना ते शक्य होत नाही त्यामुळे वारीवरून परतलेल्या वारकर्यांचा पदस्पर्श करून त्यांना गळाभेट देताना वारीचा आंनद या घेण्याचा प्रघात आपल्या परंपरेत आहे. ङ्म्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत पंढरीची वारी पुर्ण परतलेल्या वारकर्यांसोबत विदर्भ पंढरी शेगावची वारी करण्याची परंपरा दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. आज खामगाव येथून सकाळी साडेपाच वाजता ङ्म्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली त्यावेळी हजारो भाविकांनी पालखीची साथ करीत शेगावची वाट धरली.
भक्ती सागर
By admin | Updated: August 2, 2014 23:39 IST