लोकमत न्यूज नेटवर्कअकोला- बँकेच्या ३२ कोटी ९0 लाख रुपयांच्या थकीत रकमेपोटी कृषिधन सीडची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश अपर जिल्हाधिकार्यांनी बजावल्यामुळे तहसीलदारांनी कृषिधन सीडची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई शुक्रवारी केली. बँक ऑफ इंडिया शाखा इंदौरने कृषिधन सीडला दिलेल्या आपल्या ३२ कोटी ९0 लाख रुपयांच्या थकीत रकमेसाठी अपर जिल्हधिकारी अकोला यांच्याकडे अर्ज सादर करून कृषिधनची स्थानीय बिर्ला कॉलनी परिसरातील मालमत्ता ताब्यात मिळण्याची अर्जात मागणी केली होती. अपर जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात तहसीलदार यांना आदेश देत सदर मालमत्ता जप्त करून बँकेला बहाल करण्याचे निर्देश दिले. त्याची तहसीलदारांनी अंमलबजावणी करीत शुक्रवारी पुरेसा ताफा घेऊन कृषिधनची बिर्ला कॉलनी परिसरातील मालमत्ता ताब्यात घेतली. या प्रकरणात बँकेने कर्ज करार, गहाणखत, मालमत्ता पत्रक, कलम १३ /२ ची नोटिस,पोच पावती, जाहीर ताबा नोटिस व आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकार्यांना सादर केली होती. कर्जाची परतफेड करण्यास कसूर केल्याने वित्तीय मालमत्ता संपादन व पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी अधिनियम २00२ मधील कलम १३ /२ अन्वये बँकेने अतिरिक्त जिल्हधिकारी यांच्याकडे आपले म्हणणे मांडून थकीत कर्जापोटी कृषिधन सीडच्या मालकीचे एकूण ८४५६६.६१ चौ.फु.चे बिर्ला रेल्वे गेट परिसरातील ३0 प्लॉटवर जप्ती करण्याची मागणी केली होती. वारंवार केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कृषिधनची बिर्ला कॉलनी परिसरातील मालमत्ता जप्त करण्याचा निर्देश दिला. या कार्यवाहीप्रसंगी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी आदी महसूल वर्ग उपस्थित होता. या प्रकरणात बँकेची बाजू अँड. अशोक शर्मा, अँड. सौरभ अ. शर्मा यांनी मांडली.
कृषिधन सीड कंपनीच्या मालमत्तेवर बँकेची जप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:35 IST
अकोला- बँकेच्या ३२ कोटी ९0 लाख रुपयांच्या थकीत रकमेपोटी कृषिधन सीडची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश अपर जिल्हाधिकार्यांनी बजावल्यामुळे तहसीलदारांनी कृषिधन सीडची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई शुक्रवारी केली.
कृषिधन सीड कंपनीच्या मालमत्तेवर बँकेची जप्ती
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांचा आदेश बँकेच्या ३२ कोटी ९0 लाख रुपयांच्या थकीत रकमेपोटी मालमत्ता जप्त करून बँकेला बहाल करण्याचे निर्देश