शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील तीन, अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, खरप, कौलखेड, खडकी, पणन ता.अकोट, मचाणपूर ता.अकोट, पिंपळखुटा ता. अकोट, राऊतवाडी, आझादनगर, जवाहरनगर, अजय कॉलनी व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी बोरगाव मंजू येथील दोन, कोठारी व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रॅपिडचा अहवाल निरंक
बुधवारी दिवसभरात ९४ रॅपिड अँटिजन चाचण्या पार पडल्या. यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. आतापर्यंत ३२,१०५ चाचण्या झाल्या, यापैकी २१०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
६८ वर्षीय पुरुष दगावला
खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधिताचा बुधवारी मृत्यू झाला. हा रुग्ण पिल कॉलनी, एमआयडीसी रोड, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष असून, त्यांना २५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
१९ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १९ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७१६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६८७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.