शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ११५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित १०६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड येथील तीन, दुर्गा चौक, आदर्श कॉलनी, न्यू तापडियानगर, जीएमसी, अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
३६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, अवघते हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २२ अशा एकूण ३६ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल १०,६०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.